घरमनोरंजन'दिल दोस्ती दुनियादारी' फेम रेश्मा-गौरव अडकणार विवाह बंधनात ?

‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम रेश्मा-गौरव अडकणार विवाह बंधनात ?

Subscribe

येत्या काही दिवसात मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक लव्ह बर्ड्सची जोडी विवाह बंधनात अडकण्याची शक्यता

गेल्या काही महिन्यात मराठी चित्रपटसृष्टीत अनेक मराठी सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. यामध्ये प्रार्थना बेहरे, सानिका अभ्यंकर, रोहन गुजर, सागरिका घाटगे, अमेय वाघ, शशांक केतकर, आरोह वेलणकर अशी चित्रपटसृष्टीतील बरेच कलाकार मंडळी विवाह बंधनात अडकले आहेत. येत्या काही दिवसात मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक लव्ह बर्ड्सची जोडी विवाह बंधनात अडकण्याची शक्यता आहे. ही जोडी म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी या विनोदी मालिकेतील सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरात पोहचलेले सखी आणि सुव्रत यांनी प्रेक्षकांच्या मनावर भूरळ पाडली होती. हे दोघे नेहमीच एकत्र बघायला मिळतात. मग तो कोणताही कार्यक्रम असो किंवा कॉफी, सिनेमाला जातानाचे फोटे सोशल मीडियावर दोघांसह त्यांचे चाहतेही ते शेअर करतात. दोघांचे नाते हे दिवसेंदिवस बहताना दिसत आहे.

- Advertisement -

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सुव्रतने सखीसाठी टाकलेली पोस्ट पाहिल्यानंतर हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे निश्चित झाले होते. दिल दोस्ती दुनियादारी मालिकेत दोघांनीही एकत्र काम केले होते. मालिकेच्या सेटवरच दोघांची चांगली मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले. दोघांचे सोशल मीडियावर असलेले एकत्र फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांमध्ये हे दोघे अफेअरमध्ये असल्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून रंगली होती.

 

View this post on Instagram

 

You make life beautiful, Sula 🙂 ? #Repost @suvratjoshi with @get_repost ・・・ तुझी चिठ्ठी अंधारलेल्या घरात दरावाज्या खालील फटीतून एक चिठ्ठी प्रकाश घेऊन आत सरकली. दार उघडलं तेव्हा कुणीच नव्हतं पण मग जेव्हा चिठ्ठी हनुवटी गळ्यावर घट्ट दाबून सगळे दात दाखवत “हीहीही” असं हसली आणि “हाय डुक्कर” म्हणाली तेव्हा कळलं की ती गोर्यांच्या देशातून आलीय. तिने स्वतःचे बूट नीट काढून ठेवले आणि माझ्या कळकट मोज्यांकडे पाहून तिच्या कपाळावर आठी पडली. खूप आलं घातलेला,कमी दुधाचा कडक चहा पिताना चिठ्ठी ने माझी कुरकुर नीट ऐकून घेतली… माझ्या कुठल्याशा फालतू गोष्टीवर असलेल्या सात्विक संतापा वर निर्मळ हसून त्यातली हवा काढून घेतली. नंतर बराच वेळ अक्षरांची वळणं माझ्या केसातून हात फिरवत राहिली. शब्दांमधील अंतरे मला शांत करत गेली. तुझ्या शहरातलं सतत ढगाळ आकाश, मूड चांगला करून टाकणारा सूर्यप्रकाश, सुरुवातीला शहारे आणणारा आणि नंतर एकटं एकटं करून टाकणारा बर्फ हे सगळं तू त्या चिठ्ठीत पाठवलं होतस. त्या सगळ्याच्या छातीवर डोकं ठेवून,कमरेला विळखा घालून मी झोपी गेलो. सकाळी उठलो तेव्हा माझ्या बाजूला चादरीवर आजीच्या हातावर असतात तश्या सुरुकुत्या पडल्या होत्या. गुबगुबीत ढगा सारखं माझं शरीर हलकं होतं आणि खोल खोल दरी सांजवेळी असते तसं माझं मन शांत होतं. Happy Valentine’s Day! ♥️ @sakheeg Disclaimer- No we are not yet married or engaged. This is from some other ceremony!

A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg) on

- Advertisement -

आता सखी गोखलेच्या एका फोटोवरून ती लग्न करणार असल्याचे समजतेय. तिच्या या फोटोला खूप साऱ्या शुभेच्छा आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. यावर सखीने अजून कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नसले तरीही सखी आण सुव्रत लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून हे दोघे कधी विवाह बंधनात अडकणार? याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे.

 

View this post on Instagram

 

Thanks for being my introduction to pork. Luv ya! ???

A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -