घरमनोरंजन'दिलबर' गाण्याला नोराच्या बेलीचा तडका

‘दिलबर’ गाण्याला नोराच्या बेलीचा तडका

Subscribe

सध्या या चित्रपटाचीच सगळीकडे चर्चा आहे. मात्र सर्वात जास्त चर्चा होती, ती म्हणजे यातील 'दिलबर' गाण्याची. नोरा फतेहीवर चित्रीत करण्यात आलेलं हे गाणं बुधवारी प्रदर्शित करण्यात आलं आहे.

जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ पुढच्या महिन्यात १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. सध्या या चित्रपटाचीच सगळीकडे चर्चा आहे. मात्र सर्वात जास्त चर्चा होती, ती म्हणजे यातील ‘दिलबर’ गाण्याची. नोरा फतेहीवर चित्रीत करण्यात आलेलं हे गाणं बुधवारी प्रदर्शित करण्यात आलं आहे. सुष्मिता सेननं ‘सिर्फ तुम’ या चित्रपटात या गाण्यावर नृत्य केलं होतं. त्याचंच रिक्रिएशन या चित्रपटात करण्यात आलं आहे. मात्र नव्या गाण्याला नोराच्या बेली डान्सचा तडका लावण्यात आला आहे.

गाणं जुनं पण नवा साज

सुष्मिता सेनवर चित्रीत करण्यात आलेलं हे गाणं नव्वदच्या दशकात गाजलं होतं. याच गाण्याचं रिक्रिएशन नोरा फतेहीवर करण्यात आलं आहे. नोरा तिच्या बेली डान्ससाठी प्रसिद्ध आहे. तिच्यासारखा बेली डान्स फार कमी लोकांना जमतो असं मानण्यात येतं. त्यामुळं या गाण्याला नोराच्या बेली डान्सचा तडका देण्यात आला आहे. मूळ गाणं अलिका याज्ञिकनं गायलं होतं. पण यावेळी हे गाणं सध्याची आघाडीची गायिका नेहा कक्कर, धवानी भानुशाली आणि इक्कानं गायलं आहे. मूळ गाण्यामध्ये पाणी, डोंगर असं चित्रीकरण करण्यात आलं होतं, तर या नव्या स्वरुपाच्या गाण्यात गँगस्टरची बॅकग्राऊंड दाखवण्यात आली आहे. तनिष्क बागचीनं हे गाणं रिक्रिएट केलं असून जॉन आणि नोरावर चित्रीत करण्यात आलं आहे. या गाण्याला कमी कालावधीतच २४ लाखापेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

- Advertisement -

चित्रपट १५ ऑगस्टला

‘सत्यमेव जयते’ पुढच्या महिन्यात १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार असून मिलाप जवेरीनं याचं दिग्दर्शन केलं आहे. भ्रष्टाचारावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमबरोबरच मनोज वाजपेयीचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -