मी तर विसरेन, पण सायराजी कसं सहन करतील ? नाना पाटेकर दिलीप कुमार यांच्या आठवणीने भावूक

नाना पाटेकर यांनी दिलीप कुमार यांच्या आठवणीनां उजाळ देत त्यांचे आणि दिलीप कुमार यांचे नाते कसे होते याचा उलगडा केला आहे.

dilip kumar death bollywood actor nana patekar emotional shares post
मी तर विसरेन, पण सायराजी कसं सहन करतील ? नाना पाटेकर दिलीप कुमार यांच्या आठवणीने भावूक

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे काहि दिवसांपुर्वीच वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील हिंदूजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूड विश्वात 50 च्या दशकात आपली कारकिर्द घडवणारा रसिकप्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा दिग्गज अभिनेता हरपल्याने बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. बॉलिवूडचा ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे मेगास्टार अभिनेते दिलीप कुमार यांनी तब्बल पाच दशके रुपेरी पडद्यावर अनेक हिट सिनेमा दिले होते. त्यांच्या अभिनयाने प्रत्येक व्यक्ती प्रभावीत होत असे. शाहरुख खान सारखा अभिनेता त्यांच्या अभिनयाने प्रभावीत होऊन त्यांना फॉलो करत असे. इतकच नाही तरा मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत गेली अनेक दशके काम करणारे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी दिलीप कुमार यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत सोशल मीडियावर त्यांच्या आठवणीत अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत लिहले आहे की “हिमालयाची सावली, माझे साहेब गेले, अनेक लोक लिहतील,खूप काही लिहतील. शब्द तरीही कमी पडतील. खूप मोठे कलाकार तसेच एक उत्तम व्यक्तीमत्व. त्यांच्या स्मृतीला वंदन करत मी त्यांच्या शेवटच्या क्षणी सोबत राहू शकलो नाही याच मला वाईट वाटत आहे. मरेपर्यंत ही गोष्ट माझ्या मनाला चटके देउन जाणार आहे. ते माझ्यासाठी वडीलांप्रमाणे होते.”

सायरा बाने यांच्या बद्दल विचार करताना नाना पाटेकर म्हणाले “सर्वांकडे अनेक आठवणी आहेत. छोट्याश्या क्लोजअपने सुद्धा दिलीपजी अनेक गोष्टी बोलत असत. माझ्या पीढीला त्यांचा स्पर्श झाला आहे. आज सुख-दुख,हर्ष-विमर्ष,प्रेम-द्वेश सर्वांची व्याख्या बदलली आहे. मी त्यांचा कोणीही नव्हतो. पण तरीही अत्यंत दु:ख मला होत आहे. त्यांची जीवन साथी सायराजी यांना किती दु:ख होत असणार. पत्नी होने कधी,केव्हा संपले,थांबले कोणालाच याची जाण नाही. आई, वडील, बहीण,मित्र अशा अनेक भूमिका सायराजींनी निभावल्या आहे. त्यांनी स्वत:च्या चेहऱ्यावरील हास्य कधीच ढळू दिले नाही. आता कीती आठवण येत असेल त्यांना? डोळ्यांच काय वाहत्या पाण्याचा झरा,वाहत आहे. पण मनाचे काय? घरातील प्रत्येक जागा,साहेबांची असणार.मी उद्या पर्वा विसरुन जाणार पण त्या कशा विसरतील?”

नाना पाटेकर यांनी दिलीप कुमार यांच्या आठवणीनां उजाळ देत त्यांचे आणि दिलीप कुमार यांचे नाते कसे होते याचा उलगडा केला आहे. तसेच भली मोठी पोस्ट शेअर करत असतांना नाना पाटेकर भावूक झाल्याचे दिसून येत आहे.हे हि वाचा – Cannes 2021: रेड कार्पेटवरील मॉडल बेला हदीदचा नेकलेस पाहून सर्व फोटोग्राफर झाले चकीत