घरताज्या घडामोडीदिलीप कुमार यांनी नवोदितांना प्रोत्साहन दिलं नाही- नसीरुद्दीन शहा

दिलीप कुमार यांनी नवोदितांना प्रोत्साहन दिलं नाही- नसीरुद्दीन शहा

Subscribe

नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यानंतर सिनेसृष्टीत चर्चांना उधाण

ट्रॅजिडी किंग ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे गेल्या आठवड्यात दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली देत त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. दिलीप कुमार यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीतील अनेक महत्त्वाचे क्षणांचे कित्येक जण साक्षीदार आहेत. प्रत्येकाला दिलीप कुमार यांचे कौतुक आहे. संपूर्ण सिनेसृष्टीत दिपील कुमार यांचा प्रचंड चाहता वर्ग असला तरी बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात दिलीप कुमार यांच्या अभिनय कारकिर्दी विषयी आपले वयक्तिक मत व्यक्त केले आहे. जे पाहून त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दिलीप कुमार यांनी सिनेसृष्टीत एक दिग्गज कलाकार म्हणून नवोदित कलाकरांना कधीच प्रोत्साहन दिले नाही,असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सिनेसृष्टीत चर्चांना उधाण आले आहे. (Dilip Kumar did not encourage newcomers actors – Naseeruddin Shah)

पुढे नसीरुद्दीन शाह यांनी असे म्हटले आहे की, दिलीप कुमार यांनी सिनेसृष्टीत अभिनयाशिवाय काही केले नाही. दिलीप कुमार यांनी केवळ अभिनय आणि आपल्या आपुलकीच्या ठराविक सामाजिक कार्यात काम करण्यापलिकडे काहीच केले नाही. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या अनुभवांचा फायदा पुढच्या पिढीला कधीच करुन दिला नाहीय, असे स्पष्ट आणि परखड मत त्यांनी मांडले आहे. दिलीप कुमार यांनी केवळ एका सिनेमाची निर्मिती केली आणि ऑफिशिअली एकाही सिनेमाचे दिग्दर्शन केले नाही. १९७० च्या काळातील त्यांचे दमदार सिनेमे वगळता त्यांनी नव्याने येणाऱ्या कलाकारांसाठी काही खास आदर्श निर्माण केला नाही. पुढ्यात येणाऱ्या नव्या कलाकरांपैकी त्यांनी कोणाचीही दखल घेतली नाही, असे नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्या लेखात म्हटले आहे.

- Advertisement -

नसीरुद्दीन शाह यांनी दिलीप कुमार यांच्या अभिनय कारकिर्दीविषयी कितीही परखडपणे आपली मते मांडली असली तरी  नसीरुद्दीन शाह इतरांप्रमाणेच दिलीप कुमार यांचे चाहते होते. त्यांच्या अभिनयातील वेगळेपणाविषयी देखील नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्या लेखात लिहिले आहे की, दिलीप कुमार यांनी अभिनय करताना कोणताही नाट्यमय अभिनय, आवाज किंवा सतत हातवारे करणे अशा कोणत्याही मापदंडात न राहता त्यांनी आपली एक वेगळी ओळख, आपल्या अभिनयाची एक वेगळी स्टाइल तयार केली. त्यांच्या अभिनयाची स्टाइल कॉपी करण्याचा आजवर अनेकांनी प्रयत्न केला मात्र ते कोणालाच फारसे जमले नाही.


हेही वाचा – मी तर विसरेन, पण सायराजी कसं सहन करतील ? नाना पाटेकर दिलीप कुमार यांच्या आठवणीने भावूक

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -