बॉलिवूड अभिनेत्री सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री शेहनाज गिल स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाज सोशल मीडियापासून बराच वेळ दूर होती. अशातच शेहनाज आता हैसला रख या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने शेहनाज चाहत्यांसमोर आली आहे. प्रमोशनसाठी शेहनाज चाहत्यांसमोर आली असली तरी तिच्या चेहऱ्यावरील उत्साह कमी झालेला आहे.
या चित्रपटाबाबत शहनाजचा सहकलाकार दिलजीत दोसांझने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे.
या फोटोसह त्याने कॅप्शनमध्ये शेहनाजचे आभार मानत ‘तू एक खंबीर स्त्री आहेस… कायम अशीचं राहा…’ असं म्हणाला आहे. त्यामुळे शेहनाजला दु:ख विसरण्यासाठी आता दिलजीत दोसांझची साथ देत आहे.
Tension Vension Mard Ni Lende..Dinde Fattey Chakk..Rakh HONSLA RAKH 🤰🏻👨🏻🍼👩🏻🍼 #HonslaRakh 15th October Worldwide
Trailer Out Now 👼🏽 𝐇𝐎𝐍𝐒𝐋𝐀 𝐑𝐀𝐊𝐇 🍼@bajwasonam @ishehnaaz_gill #ShindaGrewal
— DILJIT DOSANJH (@diljitdosanjh) September 27, 2021
‘हैसला रख’ या चित्रपटात शेहनाज आईच्या भूमिकेत झळकणार आहे. तिच्यासोबत अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ देखील मुख्य भूमिकेत आहे. १५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. हा एक एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे.