घरमनोरंजनशाहरुखच्या वाढदिवसानिमित्त 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' पुन्हा होणार प्रदर्शित

शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ पुन्हा होणार प्रदर्शित

Subscribe

येत्या 2 नोव्हेंबर रोजी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा 57 वा वाढदिवस आहे. याचं निमित्ताने शाहरुखच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. यापूर्वी शाहरुख 2018 मध्ये त्याच्या ‘जीरो’ चित्रपटामध्ये दिसून आला होता. जवळपास 5 वर्षानंतर आता शाहरुख ‘पठाण’ चित्रपटाच्या माध्यमातून झळकणार आहे.

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला खास करण्यासाठी आणखी एक उत्तम तयारी करण्यात आली आहे. शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आयुष्यातील अनेक सुपरहिट चित्रपटांपैकी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ पुन्हा चित्रपटगृहांमध्ये येणार आहे.

20 ऑक्टोबर 1995 चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाचे आजही लाखो चाहते आहेत. लॉकडाऊन सोडल्यास हा चित्रपट 27 वर्षांपासून मुंबईच्या मराठी मंदिर चित्रपटगृहामध्ये चालू आहे. दरम्यान, येत्या 2 नोव्हेंबर रोजी शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त मराठा मंदिरव्यतिरिक्त देशभरातील PVR च्या अनेक चित्रपटगृहांमध्ये देखील दाखवला जाणार आहे. सध्या दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, अहमदाबाद, लखनऊ, पुणे आणि सुरतमध्ये 2 नोव्हेंबरच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटांचे अॅडव्हान्स बुकिंग सुरु झाले आहे.

- Advertisement -

कमी असणार तिकिटांची किंमत
शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त या तिकिटाची किंमत 100 ते 150 इतकी असणार आहे.


हेही वाचा :

शर्लिन चोप्राने पोलिसांकडे केली साजिद खानविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -