21 वर्षांपूर्वी Akshay Kumar आणि Twinkle khanna यांच्या लग्नासाठी डिंपल कपाडियाने ठेवली होती ‘ही’ अट

2000 साली ट्विंकल खन्नाचा मेला हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा अक्षयने ट्विंकलला लग्नाची मागणी घातली. तेव्हा ट्विंकलने अक्षयला म्हटले होते की, जर माझा हा सिनेमा फ्लॉप झाला तर मी तुझ्याशी लग्न करेन. आणि नशीबाने ट्विंकलचा सिनेमा खरोखर फ्लॉप झाला आणि दोघांनी नंतर लग्न केले.

Dimple Kapadia had set 'this' condition for marriage of Akshay Kumar and Twinkle khanna
21 वर्षांपूर्वी Akshay Kumar आणि Twinkle khanna यांच्या लग्नासाठी डिंपल कपाडियाने ठेवली होती 'ही' अट

अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar)  आणि ट्विंकल खन्ना (Twinkle khanna)  यांच्या लग्नाला 21 वर्ष पूर्ण झाली आहेत. 17 जानेवारी 2001मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. अक्षय कुमारला ट्विंकल सोबत लग्न करणे काही सोप्पे नव्हते कारण ट्विंकलची आई अभिनेत्री डिंपल कपाडिया हिने दोघांना लग्नासाठी काही विचित्र अटी घातल्या होत्या. त्या सगळ्या अटी मान्य करुन अक्षय ट्विंकल यांनी 21 वर्ष नेटाने संसार करुन आयुष्यभर साथ निभावण्यासाठी तयार आहेत. अक्षयला ट्विंकल सोबत लग्न करण्यासाठी खूप कष्ट झेलावे लागले होते. डिंपल कापाडियाने दोघांसमोर अशा कोणत्या अटी ठेवल्या होत्या जाणून घेऊया.

 

View this post on Instagram

 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

अक्षय कुमार आणि ट्विंकल यांची भेट फिल्मफेअरच्या एका फोटोशूटला झाली होती. पहिल्याच भेटील ट्विंकल अक्षयच्या प्रेमात पडली होती. इंटरनॅशन खिलाडी या सिनेमाच्या शुटींगवेळी दोघांना आपल्या प्रेमाची जाणीव झाली. एका मुलाखतीत ट्विंकलने म्हटले होते, मी जेव्हा अक्षय सोबत डेट करण्यास सुरुवात केली तेव्हा एका मोठ्या नात्यातून बाहेर आली होती.

2000 साली ट्विंकल खन्नाचा मेला हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा अक्षयने ट्विंकलला लग्नाची मागणी घातली. तेव्हा ट्विंकलने अक्षयला म्हटले होते की, जर माझा हा सिनेमा फ्लॉप झाला तर मी तुझ्याशी लग्न करेन. आणि नशीबाने ट्विंकलचा सिनेमा खरोखर फ्लॉप झाला आणि दोघांनी नंतर लग्न केले. असे म्हटले जाते की जर ट्विंकलचा सिनेमा हिट झाला असता दोघांचे लग्न झाले नसते.

अक्षय आणि ट्विंकल यांच्या नात्याची माहिती जेव्हा तिने आई डिंपल कापाडिया आणि अभिनेते राजेश खन्ना यांना दिला तेव्हा डिंपल कपाडियाने दोघांसमोर विचित्र अट ठेवली होती. डिंपल अक्षय कुमारला म्हणाली होती की, माझ्या मुलीसोबत लग्न करायचे असेल तर दोघांना एक-दोन वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहावे लागेल. या दिवसात तुमचे नाते चांगले राहिले तर मी माझ्या मुलीचे तुझ्याशी लग्न लावून देईन, असे डिंपलने म्हटले होते. डिंपलची ही अट आज फार सोप्पी वाटते कारण आजकाल सर्रासपणे तरुण तरुणी लिव्ह इनमध्ये राहतात. मात्र त्यावेळी डिंपलची ही अट ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.

डिंपल कापडियाच्या अटीनुसार, अक्षय आणि ट्विंकल एक दोन वर्ष लिव्ह इन मध्ये राहून नंतर त्यांनी लग्न केले. मीडिया रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, दोघांचे लग्न फार घाईत झाले होते त्यामुळे राजेश खन्ना यांच्या मित्राच्या गच्चीत दोघांचे लग्न लावण्यात आले होते. 2002मध्ये दोघांना आरव नावाचा पहिली मुलगा झाला. त्यानंतर दहा वर्षांनी 2012मध्ये अक्षय ट्विंकलच्या आयुष्यात नितारा ही मुलगी आली. मुलांच्या जन्मावेळी देखील ट्विंकलने अक्षयसमोर अट ठेवली होती. जर सातत्याने सिनेमात काम करणार असशील तरच मी फॅमिली प्लॉनिंगचा विचार करेन. अक्षयने एका मुलाखतीत म्हटले होते की, ट्विंकलने ठेवलेल्या अटीनंतर माझी काय हालत झाली होती हे मलाच माहिती आहे. मात्र तिच्या या अटीनंतर मी सिनेमातील करिअर फार गांभीर्याने घेतले.


हेही वाचा – ‘Sacred Games’ च्या तिसऱ्या सीजनच्या शूटिंगला सुरुवात ? अनुराग कश्यपने सांगितले सत्य