सानिकाच्या हट्टीपणामुळे दिपूचा जीव धोक्यात?

मन उडु उडु झालं या मालिकेचे येणारे एपिसोड महत्वपूर्ण असणार आहेत, मालिकेला येणार रंजक वळण, सानिकाच्या हट्टीपणामुळे दिपूवर संकट येणार आहे. असं हि मालिकेच्या पुढल्या काही भागात पाहायला मिळणार आहे.

Man Udu Udu Jhalay fem actress Hruta Durgule special interview
Man Udu Udu Jhalay fem actress Hruta Durgule special interview

मन उडू उडू झालं (man udu udu zhala) ही मालिका अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. या मालिकेतील इंद्रा आणि दिपू या जोडीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. या मालिकेतील सानिकाच्या चुकीच्या वागण्यामुळे सर्वांनाच त्रास होत असतो. सानिका तिच्या घरच्यांशी सुद्धा खोटं बोलते. पण सानिका गरोदर असल्याचं खोटं सर्वांसमोर येणारे आहे. आणि त्याच बरोबर सानिकाच्या हट्टीपणामुळे दिपूवर संकट येणार आहे. असं ही मालिकेच्या पुढल्या काही भागात पाहायला मिळणार आहे.

खरंतर कोणत्याही कथानकात खलनायकाची किंवा खलनायिकेची भूमिका असली की ते कथानक अधिक रंजक होतं. मन उडु उडु झालं (man udu udu zhala episode) ह्या मालिकेत सुद्धा कार्तिक आणि सानिका ही दोन पात्रं नकारात्मक पात्र साकारताना दिसत आहेत. (negative characters)आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरून त्रागा आणि भांडणं करताना सुद्धा हे दोघ दिसतात. आणि त्याचा त्रास त्यांच्या घरच्यांना होतो. मालिकेतील मागच्या काही भागात सानिका ती गरोदर असल्याचं खोटं सांगताना दिसते आहे. देशपांडेंच्या घरी पूजेला गेल्यावर ती मुद्दामहून पपई खाताना दिसते. आणि त्यामुळे दिपू तिला घेऊन डॉक्टरांकडे जाते, पण सानिका डॉक्टरांकडे जायला नकार देते पण तरी दिपू (hruta durgule as dipu) तिला घेऊन डॉक्टरांकडे जाते. आणि तिथे गेल्यावर सानिका गरोदर असल्याचं नाटक करते यावेळी ती आपल्या सगळ्यांशीच खोटं बोलते आहे हे दिपूला समजतं. घरी चोर ओटी भरताना घरच्यांनी तिला मोठं काही गिफ्ट दिलं नाही म्हणून सानिका खूप त्रागा करते घरच्याना खूप बोलते.  हे सगळं सहन न झाल्याने दिपू सगळ्यांना खरं सांगते. त्यावर आत्ता घरच्यांची प्रतिक्रिया काय असणार आहे हे येणाऱ्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)


दुसरीकडे दिपू (dipu) सानिकाला (sanika) सजवायला जाते, मात्र दिपूलाच ती घराबाहेर काढते. यावेळी दिपूला धक्का दिल्याने रस्त्यावरच्या एका गाडीची दिपूला धडक लागते आणि ती जमिनीवर कोसळते. याच दिपूचा भीषण अपघात होतो. असं मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं आहे. दरम्यान हा प्रोमो पाहून प्रेक्षकानै सानिकावर राग व्यक्त केला आहे. मालिकेत पुढे काय घडणार आहे, हे मालिकेच्या येणाऱ्या भागांमधून पाहायला मिळणार आहे.

मन उडु उडु झालं (man udu udu zhala) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने स्वतःची व्यक्तिरेखा उत्तम साकारली आहे. या मालिकेतील मुख्य पात्रांबद्दल बोलायचं झालंच तर या मालिकेतील नायक इंद्रा म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत (ajikya raut)हा त्यांच्या डॅशिंग स्टाईल मुळे सर्वांचाच लाडका झाला आहे, तर या मालिकेत दीपिकाची व्यक्तिरेखा साकारणारी अभनेत्री ऋता दुर्गुळे (hruta durgule) ही  सुद्धा तिच्या सध्या सरळ अभिनयाने प्रेक्षकांची लाडकी झालीय. या सोबतच मालिकेत काम करणारी इतर कलाकार मंडळी (star cast) सुद्धा त्यांच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांचे आवडते झाले आहेत.