Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन दिल्ली अहमदाबादच्या सरणावर IPL जोरात, केदार शिंदेंचे ट्विट चर्चेत

दिल्ली अहमदाबादच्या सरणावर IPL जोरात, केदार शिंदेंचे ट्विट चर्चेत

दिग्दर्शक केदार शिंदे नेहमीच आपले मत रोखठोकपणे सोशल मीडियावर मांडत असतात. आसपास घडणार्‍या चांगल्या- वाईट परिस्थितीवर ते नेहमी भाष्य करतात.

Related Story

- Advertisement -

जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अपुर्‍या सोयी सुविधे अभावी अनेक रुग्ण दगावत आहेत. कोरोनाची भीषण परिस्थिती पाहता सरकारने कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी अनेक राज्यात कडक लॉक डाउन जाहीर केलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. पण सामान्य माणसालाच या नियमांच पालन काराव लागत आहे का? असा विचार अनेकांच्या मनात सतावत आहे. कारण सरकार सोशल डिस्टनसिंगचे पालन करा असे सांगत असताना सुद्धा अनेक प्रचार सभा,निवडणूक रॅलीचे आयोजन, बड्या मंत्र्याच्या लग्नाला खुलेआम गर्दी होतांना दिसते. अशातच मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सद्य स्थिती वर आपलं मत मांडले आहे. केदार शिंदे यांनी केलेली पोस्ट ची  सोशल मीडियावर चर्चा होतांना दिसते. सध्या देशात आयपीएल चे वारे वाहत आहेत. कोरोना सारख्या भयानक स्थितीतही आयपीएल सारखा इवेंट जल्लोषात थाटात सुरू आहे. या स्थिती वर रोष प्रकट करत केदार शिंदे यांनी ट्विट करत लिहलं आहे की,” याक्षणी बक्कळ पैसा कमावणारे म्हणजे.. #RanveerSingh. आणि त्याच्या जाहीरातींच्या मधे दाखवले जाणारे #ipl वाले.. दिल्लीच्या व अहमदाबाद च्या सरणावर ipl जोरात…” केदार यांच्या या ट्विट वर लोकांची समिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

- Advertisement -

दिग्दर्शक केदार शिंदे नेहमीच आपले मत रोखठोकपणे सोशल मीडियावर मांडत असतात. आसपास घडणार्‍या चांगल्या- वाईट परिस्थितीवर ते नेहमी भाष्य करतात.


हे हि वाचा – शाल्मली खोलगडे, सुनिधी चौहान यांनी रचला इतिहास, न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर पहिल्यांदा झळकल्या भारतीय महिला सिंगर

- Advertisement -