घरताज्या घडामोडीमधुर भांडारकर देशाच्या लॉकडाऊनवर करणार चित्रपट

मधुर भांडारकर देशाच्या लॉकडाऊनवर करणार चित्रपट

Subscribe

भारताच्या लॉकडाऊनवरील चित्रपटाची शूटिंग जानेवारीपासून सुरू होणार आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टीवर मोठा परिणाम झाला होता. पण अनलॉकनंतर अनेक चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. आता बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक मधुर भांडारकर कोरोना व्हायरसनंतर देशभरात लागू झालेल्या लॉकडाऊनवर चित्रपट तयार करणार आहे. एका हिंदी वृत्तसंस्थेशी बातचित करताना मधुर भांडारकरने याला दुजोरा दिला. माहितीनुसार, या चित्रपटाचे नाव ‘इंडिया लॉकडाऊन’ असे असणार आहे. जानेवारी महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंग सुरुवात होणार आहे.

एका हिंदी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे शूटिंग मुंबईत आणि आजूबाजूच्या भागात होणार आहे. मधुर भांडारकर याबाबत स्वतः म्हणाला की, ‘चित्रपट ‘इंडिया लॉकडाऊन’मध्ये देशभरात लॉकडाऊन झाल्यानंतर समाजातील विविध भागांवर झालेला परिणाम संवेदनशीलतेसह दाखवला जाईल.’

- Advertisement -

पुढे मधुर भांडारकर चित्रपटच्या कास्टिंगविषयी म्हणाला की, ‘सध्या चित्रपटाच्या कास्टिंगबाबत काही सांगू शकत नाही. पण इतके सांगू शकतो की, माझा हा चित्रपट माझ्या गेल्या चित्रपटासारखाच हृदयाला स्पर्श करणारा असेल.’ मधुर भांडारकरचा या अगोदरचा चित्रपट ‘इंदु सरकार’ इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये लावलेल्या आणीबाणीवर आधारित होता. पण हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. याशिवाय मधुर भांडारकरने ‘चांदनी बार’, ‘पेज थ्री’, ‘फॅशन’, ‘जेल’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘हिरोईन’, ‘कॅलेंडर गर्ल’ सारखे चित्रपट केले आहेत.


हेही वाचा – अवधूत गुप्तेचं सामाजिक विषयावरील पहिलं रॅप सॉंग

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -