घरमनोरंजनप्रविण तरडे बाप्पाच्या डेकोरेशनमुळे वादात; संविधानाचा केला अपमान

प्रविण तरडे बाप्पाच्या डेकोरेशनमुळे वादात; संविधानाचा केला अपमान

Subscribe

अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून यावेळी ते बाप्पासाठी केलेल्या देखाव्यामुळे वादात सापडले आहेत. राज्यभरात आज गणरायाचे भक्तीभावाने आगमन झाले आहे. सर्वसामन्यांपासून ते राजकीय नेते, सेलिब्रिटींच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे. मात्र, प्रवीण तरडे यांनी घरी गणपतीच्या केलेल्या प्रतिष्ठापनेवरून सोशल मीडियावर वाद पेटला असून प्रवीण तरडेंवर चौफेर टीका होत आहे.

- Advertisement -

प्रवीण तरडेंच्या घरी आज गणरायाची प्रतिष्ठापना झाली. घरच्या गणपतीसाठी तरडे यांनी पुस्तकांचा देखावा केला आहे. बाप्पाच्या देखाव्यासाठी चारही बाजूने पुस्तके लावण्यात आली आहेत. यात गणेशाची मूर्ती ही पाटावर ठेवली आहे. हा पाट देशाची राज्यघटना अर्थात संविधानावर ठेवला आहे. यावरुन प्रविण तरडे यांच्यावर चौफेर टीका होत आहे. केसं वाढले म्हणून मेंदूची वाढ खुंटली का? असा सवाल सोशल मीडियावरुन विचारण्यात आला आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर टीका होत असल्यामुळे अखेर प्रविण तरडे यांनी तो फोटो डिलीट करुन टाकला आहे. त्यानंतर नव्याने गणपतीच्या प्रतिष्ठापनेचा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये संविधान पाटाखालून काढण्यात आल्याचे दिसत आहे. दरम्यान, प्रवीण तरडेंनी आपली चूक मान्य केली आहे. याबाबतचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.

प्रविण तरडेंना चूक मान्य, मागितली माफी

गणपती बाप्पासाठी संविधानाच्या पुस्तकाचा पाट केल्यानंतर ट्रोल झालेल्या प्रवीण तरडेंनी अखेर मागितली माफी

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Saturday, 22 August 2020

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -