घरमनोरंजनराकेशच्या मदतीने प्रविण तरडेंनी साकारला बाप्पा!

राकेशच्या मदतीने प्रविण तरडेंनी साकारला बाप्पा!

Subscribe

अभिनेता राकेश बापट दरवर्षी आपल्या हाताने गणपतीची मुर्ती तयार करतो. त्याचप्रमाणे त्याने यावर्षीही त्याने गणपतीची मुर्ती तयार केली. यावर्षी मुर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मुर्ती नदीच्या गाळापासून तयार करण्यात आली आहे. तर यामुर्तीला नैसर्गिक रंगाने रंगवण्यात आलं आहे. तर यावर्षी पहिल्यांदाच दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी शाडूच्या माती पासून इको फ्रेंडली मुर्ती राकेश बापटच्या मदतीने तयार केली आहे.

- Advertisement -

प्रविण तरडे म्हणाले, मला लहानपणापासून गणपतीची मूर्ती साकारायची होती मात्र कधीच जमले नाही, यंदा राकेशमुळे तो योग जुळून आला. या शिल्पकलेत मी पूर्ण तल्लीन झालो होतो, चित्रपट कलाकृती ही आपली निर्मिती असते यामुळे यात आपल्यापेक्षा काहीच मोठे नाही असे वाटते, मात्र ही मूर्ती साकारताना समजले की कलाकृती पेक्षा आपण कधीच मोठे होऊ शकत नाही.

- Advertisement -

दरम्यान महाराष्ट्रावर कोरड्या दुष्काळाचे संकट नेहमी येते यंदाही काही भागावर आहे, तर पश्चिम महाराष्ट्रात महापुराचे संकट आले होते, असे कोणतेच नैसर्गिक संकट पुन्हा येऊ नये असे साकडे घालणार आहे.
मी पहिल्यांदाच बाप्पांची मूर्ती साकारली आहे. हा बाप्पा आकार घेत होता तेव्हा आमच्या मनातही नव्हते की मी आणि राकेश काही तरी एकत्र करू शकू मात्र तो योग आता जुळून आला आहे.

राकेश बापट म्हणाला, मूर्ती साकारण्यासाठी आठ दिवस लागतात, या कामात मला कधीही कंटाळा येत नाही. मला यातून सकारात्मक उर्जा मिळते, नकारात्मक विचार निघून जातात. या काळात मी एकटा असतो यामुळे विचार करायला वेळ मिळतो, इतर वेळी असा एकांत मिळत नाही. गणेशोत्सव मला नेहमी उत्साह देऊन जातो. ‘मुळशी पॅटर्न’ सारख्या चित्रपटात काम करायला आवडेल पण मला त्यापेक्षा वेगळ्या विषयावर चित्रपट करायचा आहे. पुढे आमच्या बोलण्यातून एक विषय आला त्यावर आम्ही चित्रपट निर्माण करण्याचे ठरवले आहे. मला मनापासून प्रविण सरांबरोबर काम करण्याची इच्छा होती तो योग बाप्पांच्या मूर्तीच्या निमित्त्ताने जुळून आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -