Monday, June 21, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन कार्तिक आर्यनच्या समर्थनार्थ दिग्दर्शक-निर्माता अनुभव सिन्हानी केलं ट्विट

कार्तिक आर्यनच्या समर्थनार्थ दिग्दर्शक-निर्माता अनुभव सिन्हानी केलं ट्विट

सुशांतप्रमाणेच कार्तिकने देखील आऊटसाईडर असूनसुद्धा आपले प्रस्थ बॉलिवूड मध्ये निर्माण केले आहे ही बाब अनेकांना खुपत आहे का ? असा प्रश्न लोकांसमोर उभा राहिला आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन गेले काही दिवस चर्चेच्या झोतात आहे. कार्तिकला अनेक बिग बजेट सिनेमामधून काढून टाकण्यात येत असल्याच्या चर्चा सोयीनुसार पेरल्या जात आहे. कार्तिकचा सुशांत सिंग राजपूत तर होणार नाही ना अशी भीती आता कार्तिकला सपोर्ट करणार्‍या लोकांमध्ये वाढली आहे. सुशांतप्रमाणेच कार्तिकने देखील आऊटसाईडर असूनसुद्धा आपले प्रस्थ बॉलिवूड मध्ये निर्माण केले आहे ही बाब अनेकांना खुपत आहे का ? असा प्रश्न लोकांसमोर उभा राहिला आहे. नुकतच कार्तिकची बाजू मांडत दिग्दर्शक आणि निर्माता अनुभव सिन्हा( Anubhav Sinha ) यांनी कार्तिक विरुद्ध नक्कीच काही तरी मोठ षड्यंत्र,कॅम्पेन केलं जात आहे असे म्हंटले आहे.

- Advertisement -

अनुभव सिन्हा यांनी ट्विटरवर लिहलं आहे की,” एखादा निर्माता कोणत्याही अभिनेत्याला फिल्म मधून काढले जाते किंवा अॅक्टर सिनेमा सोडून देतो तेव्हा ते याच्यावर कोणतीच चर्चा करत नाही. आणि नेहमी असेच होते. हे कार्तिक आर्यन विरुद्ध काही तरी मोठे षडयंत्र रचले जात आहे. हा अन्याय आहे. मी कार्तिकच्या शांततेचा,चुप्पीचा आदर करतो.

सध्या कार्तिक बद्दल अनेक बातम्या सामोरे येत आहे. कधी त्याच्या स्वभावामुळे चित्रपटातून काढले असल्याचे सांगण्यात येते तर कधी स्क्रिप्ट मध्ये बदल करण्यास सांगत असल्यामुळे त्याला काढून टाकण्यात आले असे अनेक तर्क-वितर्क,अफवा,बातम्या समोर येत आहे. कार्तिकने लवकरच समोर येऊन लोकांच्या प्रश्नाचे निरसन करणे आता गरजेचं आहे. चाहत्यांकडून तसेच कार्तिकच्या हितचिंतकाकडून काळजी व्यक्त केली जात आहे तसेच त्याच्या समर्थनात अनेक जन पुढे येताना दिसत आहे.


- Advertisement -

हे हि वाचा – TheFamilyMan2 : रिलीज होण्याआधीच मनोज वाजपेयीने शेअर केली भावनिक पोस्ट

- Advertisement -