घरमनोरंजनसुभाष घई खूश हुआ

सुभाष घई खूश हुआ

Subscribe

शो मॅन म्हणून राज कपूर यांचे नाव घेतले जात होते. पुढे असा काहीसा उल्लेख सुभाष घईंच्या बाबतीतही होऊ लागला. खरतर त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नायक म्हणून स्थीर व्हायचे होते, पण आपण कुशल संकलक आहोत, दिग्दर्शनही उत्तम करु शकतो या बळावर अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. ताल या चित्रपटापर्यंत त्यांची यशाची घोडदौड होती. पुढे मात्र त्यांना ते यश टिकवता आलेले नाही. सनई चौघडा या मराठी चित्रपट निर्मितीत त्यांचा सहभाग होता आणि आता ती अ‍ॅण्ड ती या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचे नाव पुन्हा जोडले जाणार आहे.

ती अ‍ॅण्ड ती या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी या करित आहेत. निर्मितीतही दुसर्‍यांचे नाव आहे. बॅनरसुद्धा घई यांचे नाही, मग या चित्रपटासाठी त्यांचे नाव का जोडले जाते असा प्रश्न निर्माण होतो. या चित्रपटाची तांत्रिकबाजू ज्या नवयुवकांनी सांभाळलेली आहे, ते अकरा विद्यार्थी सुभाष घई यांच्या व्हिसलिंग वूडस या तांत्रिक आणि अभिनयाचे प्रशिक्षण देणार्‍या संस्थेतले आहेत. चित्रपट प्रभावी होण्याच्यादृष्टीने या विद्यार्थ्यांनी घेतलेले श्रम महत्त्वाचे ठरणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -