घरCORONA UPDATEनाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोनाची बाधा, रूग्णालयात दाखल!

नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोनाची बाधा, रूग्णालयात दाखल!

Subscribe

नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोना संसर्ग झाला आहे. सुरूवातीला त्यांनी स्वत:ला घरीच क्वारंटाईन केलं होतं. मात्र आता वांद्रे येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विजय केंकरे यांची आई ललिता केंकरे यांचे नुकतेच निधन झाले होते. गेल्या सहा- सात दिवसापासून त्यांना ताप येत होता. त्यामुळे त्यांनी घरीच स्वत:ला क्वारंटाईन केलं.

आज त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना सध्या वांद्रे येथील लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

- Advertisement -

विजय केंकरे यांनी अनेक यशस्वी नाटकांच दिग्दर्शन केलं आहे. सुयोग या संस्थेद्वारे अनेक नाटकं त्यांनी केली आहेत. दिग्दर्शक म्हणून नाट्यक्षेत्रात त्यांच मोठं नाव आहे. भाई.. व्यक्ती की वल्ली आणि मुंबई-पुणे-मुंबई ३ या चित्रपटांमधून त्यांनी कामं केली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -