घरमनोरंजन'राधे'चित्रपटातील 'झूम-झूम' गाण्यात दिशा पटानी आणि सलमान खानचा जबरदस्त केमिस्ट्री धमाका !

‘राधे’चित्रपटातील ‘झूम-झूम’ गाण्यात दिशा पटानी आणि सलमान खानचा जबरदस्त केमिस्ट्री धमाका !

Subscribe

झूम-झूम हे नवीन गाणं देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला तयार झाले आहे. 'राधे' हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रे

अभिनेता सलमान खानच्या ‘राधे: युवर मोस्ट वांटेड भाई’ या आगामी चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. बॉलिवूडचा दबंग  खानच्या ‘राधे’ चित्रपटाची चाहते अतुरतेने वाट पाहत आहेत.चित्रपटातील प्रत्येक ट्रॅकने आत्तापर्यंत जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक आकडे प्राप्त केले आहेत. सोबतच चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. आता चित्रपटाला प्रदर्शित होण्यास तीन दिवस बाकी असताना ‘राधे: युवर मोस्ट वांटेड भाई’ च्या निर्मात्यांनी एक नवं गाणे प्रदर्शित केले आहे. झूम-झूम असे गाण्याचे नाव असून सलमान खान आणि दिशा पटानीची जबदस्त सिजलिंग केमिस्ट्री या गाण्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बहुप्रतिक्षित चित्रपटातील ही जोडी ऑन-स्किन धूमाकूळ घालताना दिसत आहे. कुणाल वर्मा लिखित हे झूम-झूम एक रोमँटिक डान्स नंबर आहे. या गाण्याला ग्रुवी बीट्स आहेत सोबतच सलमान आणि दिशा यांची जबदस्त केमिस्ट्री आहे. या गाण्याद्वारे आपल्याला चित्रपटातील सलमान आणि दिशा यांच्यातील केमिस्ट्रीची झलक पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

साजीद-वाजीद यांनी दिलेल्या सुंदर संगीत रचनेसोबतच सलमान खानच्या फंकी आणि आकर्षक हुकस्टेप्सने भरलेले आहे. हे गाणं प्रेक्षकांना सलमान आणि संगीत यांच्यासह नाचण्यास भाग पाडेल. गाण्यात सलमान आणि दिशासोबत रणदीप हुड्ड आणि जॅकी श्रॉफ यांच्याही महत्तवपूर्ण भूमिका आहेत. ऐश किंग आणि इयूलिया वंतूर यांचा आवाज यागाण्याला लाभला आहे. तसेच सीजर गोंसाल्विस यांनी गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. नुकतच राधे चित्रपटातील ‘सीटी मार’ हे गाणं प्रदर्शित झाले होते. हे गाणं प्रदर्शित होताच ब्लॉकबास्टर हिट ठरले आहे. आता झूम-झूम हे नवीन गाणं देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला तयार झाले आहे. ‘राधे’ हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट झी ५ वर पे पर व्ह्यूनुसार पाहता येणार आहे.


हे हि वाचा – नेहा धुपियाचा फोन अंगद बेदी लपून चेक करत असल्याचा केला खुलासा म्हणाला….

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -