दिशा पटानीचा बिकनीत जलवा, बोल्ड लूकने चाहते घायाळ

दिशा पटनी बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय

disha patani bikini photoshoot at maldives
दिशा पटानीचा बिकनीत जलवा, बोल्ड लूकने चाहते घायाळ

सध्या बॉलिवूड सेलिब्रेटी पार्टी मूड मध्ये आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सेलिब्रेटी तयार झाले आहेत. काही कलाकार सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी सुंदर ठिकाणी गेले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी देखील बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसोबत आता मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. दिशाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. ज्यात ती बिकीन घालून समुद्र किनाऱ्यावर उभी आहे.  दिशाच्या सिजलिंग फोटोंनी चाहत्यांना प्रेमात पाडले आहे. दिशाच्या या बोल्ड फोटोंची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

तर दिशासोबत सुट्टयांचा आनंद घेतल असलेल्या टायगर श्रॉफने देखील त्याच्या सोशल मीडियावर एका खास व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो समुद्रातून बाहेर येताना दिसत आहे. शर्टलेस टायगरची बॉडी पाहून टायगरचे फॅन्स त्याच्यावर फिदा झाले आहेत. टायगरच्या फोटोवर त्याची बहिण कृष्णा श्रॉफने देखील कमेंट करत त्याचे कौतुक केले आहे. कोणतेही कॅप्शन न देता दोघांनी व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे. दोघांचे लोकेशन देखील सारखेच दिसत आहे. त्यामुळे दोघेही एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचे म्हटले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

दिशा पटनी २०२१मध्ये सलमान खानच्या राधे या सिनेमात दिसत होती. नव्या वर्षात दिशा योद्धा, ते टीना, एक विलन रिटर्न्स, मलंग २ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर टायगर श्रॉफ सध्या बागी ४ आणि गणपत या सिनेमांमुळे चर्चेत आले. दोन्ही सिनेमे जबरदस्त अँक्शनने भरलेले आहेत. २०२२मध्ये हे सिनेमे प्रेक्षकांना पाहता येणार आहे.


हेही वाचा – Shehnaaz Gill: शहनाजचा ‘झिंगाट’ डांस सोशल मीडियावर व्हायरल