दिशा पटानीने बॉयफ्रेंड टायगर श्रॉफला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, शेअर केला फोटो

दिशा आणि टायगर अनेक वर्षांपासून एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहेत. २०१६ पासून ते एकमेकांना ओळखतात. बेफिक्रा या म्युझिक व्हिडीओचे शुटींग दोघांनी एकत्र केले होते. दोघेही नेहमी, लंच डेट करताना स्पॉट होत असतात.

disha patani wished boyfriend tiger shroff on his birthday
दिशा पटानीने बॉयफ्रेंड टायगर श्रॉफला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, शेअर केला फोटो

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ त्याचा ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. टायगरने त्याच्या जबरदस्त अभिनय आणि स्टंटने सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. टायगरची कथित गर्लफ्रेंड दिशा पाटनीने देखील वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्यात. दिशाने टायगरासाठी स्पेशल व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

दिशाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये टायगर श्रॉफ फार सुंदर स्मॉइल देताना दिसत आहे. ‘हॅपी बर्थडे माय बेस्ट फ्रेंड, तुझ्या मेहनतीने आणि तुझ्या सुंदर मनाने आम्हाला प्रेरित करण्यासाठी खूप खूप धन्यवाद, तू फार सुंदर आहेस’ ,असे म्हणत दिशा पाटनीने व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये टायगर श्रॉफ शर्टलेस आणि मस्कुलर अंदाजात दिसत आहे. व्हिडीओत बॅकग्राउंडला बर्थ डे साँग वाजत आहे.

दिशा आणि टायगर अनेक वर्षांपासून एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहेत. २०१६ पासून ते एकमेकांना ओळखतात. बेफिक्रा या म्युझिक व्हिडीओचे शुटींग दोघांनी एकत्र केले होते. दोघेही नेहमी, लंच डेट करताना स्पॉट होत असतात. अनेकदा दोघे एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेतानाही दिसतात. दिशाही श्रॉफ कुटुंबांसोबत अनेक सण साजरे करताना दिसते. दिशा तिच्या सोशल मीडियावर टायगरच्या भाऊ बहिणींसोबत अनेक स्टोरीज शेअर करत असते.

दिशा आणि टायगर यांच्या सतत एकत्र असल्याने दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती. मात्र दोघांनीही रिलेशनशिपमध्ये नसल्याचे म्हटले होते. आम्ही फक्त बेस्ट फ्रेंड्स आहोत असा खुलासा दिशाने एका मुलाखतीत केला होता.

टायगर श्रॉफच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचे झाले तर टायगर लवकरच हिरोपंती २ आणि गणपत या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारसोबत बडे मिया छोटे मिया या सिनेमातही टायगर दिसणार आहे.


हेही वाचा – Pathan Teaser : ‘उसने देश को ही धर्म मान लिया’; शाहरूखच्या ‘पठाण’चा दमदार टीझर रिलीज