बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या प्रोफेशनल आयुष्याव्यतिरिक्त पर्सनल आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत असते. टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशाचं नाव तिचा जवळचा मित्र अलेक्जेंडरसोबत जोडलं गेलं. मात्र, त्यांच्या नात्याबाबत दिशाने कधीही खुलासा केला नाही. दरम्यान, अशातच सोशल मीडियावर अलेक्जेंडरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये चक्क त्याने त्याच्या उजव्या हातावर दिशाच्या चेहऱ्याचा टॅटू काढला आहे.
दिशा पटानीच्या बॉयफ्रेंडने काढला टॅटू
View this post on Instagram
मॉडल आणि अभिनेता अलेक्जेंडर आणि दिशा पटानीला अनेकदा एकत्र पाहिलं जातं. टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा पटानी अलेक्जेंडरसोबत रिलेशनशिपमध्ये आली. नुकताच अलेक्जेंडरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो दिशाच्या चेहऱ्याचा जबरदस्त टॅटू काढला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून युजर्स या वर अनेक कमेंट्स करत आहेत. एकाने यात लिहिलंय की, “आता टायगरचं काय होणार?” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “हा तर खूपच सिरयस झाला आहे.”
दिशा आणि टायगरच्या ब्रेकअप मागचे कारण
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांना अनेकदा एकत्र स्पॉट केले जायचे. मात्र, काही महिन्यांपूर्वी 6 वर्षाच्या नात्यानंतर दिशा आणि टायगरचा ब्रेकअप झाला. परंतु ही गोष्ट कधीही त्यांनी जगजाहिर केली नाही.