एक्स बॉयफ्रेंड टायगरला दिशाने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा आज 33 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने टायगरचे चाहते आणि अनेक कलाकार त्याला शुभेच्छा देत आहेत. अशातच टायगरची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री दिशा पटानीने देखील त्याला सोशल मीडियावरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ब्रेकअपनंतरही दिशाने टायगरला शुभेच्छा दिलेल्या पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

दिशाने शेअर केला टायगरचा क्युट फोटो

दिशाने टायगरचा एक क्युट फोटो शेअर केला आहे ज्या फोटोमध्ये टायगरने एक टायगर प्रिंटेड स्कार्फ घातलेला आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत दिशाने लिहिलंय की, “हॅप्पी बर्थडे टिग्गी. नेहमी सुंदर आणि प्रेरणादायी राहा.” दिशाने शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

काही महिन्यांपूर्वी झाला होता ब्रेकअप

दिशा आणि टायगर मागील 6 वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. मात्र, नुकत्याच काही महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाला. सूत्रांच्या मते, दिशाला टायगरसोबत लग्न करायचे होते पण टायगर त्यासाठी तयार नव्हता. त्यामुळेच या दोघांचा ब्रेकअप झाला असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्या चाहत्यांना ते पुन्हा एकत्र येतील अशी अपेक्षा होती मात्र, तसे झाले नाही. आता या दोघांचा ब्रेकअप झाला असला तरीही दोघांची मैत्री तशीच असल्याचं या पोस्टमुळे दिसून येत आहे.

दरम्यान, आगामी काळात दिशा पटानी ‘योद्धा’ आणि ‘शिवा’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर टायगर श्रॉफ ‘गणपत’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.


हेही वाचा :

माझ्यामध्ये ही गोष्ट नाही… रणबीरने सांगितलं सोशल मीडिया न वापरण्यामागचं कारण