लग्नाच्या १५ वर्षानंतर सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती जाधव यांचा घटस्फोट? दोन वर्षापासून दोघांमध्ये दुरावा

सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती जाधव यांनी लग्नाच्या १५ वर्षानंतर एकमेकांपासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला आहे

अलीकडे बॉलिवूड आणि टॉलिवूड कलाकारांच्या घटस्फोटाच्या अनेक बातम्या आपण वारंवार पाहतो, गेल्या काही दिवसांपासून मराठीसिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या वैवाहिक आयुष्यातही काही अडचणी निर्माण झाली असल्याची बातम्या समोर येत होत्या. सुरूवातीला या सर्व अफवा असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाला आहे.

सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती जाधव यांनी लग्नाच्या १५ वर्षानंतर एकमेकांपासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला आहे. याचं कारण म्हणजे सिद्धार्थची पत्नी तृप्तीने नुकतेच तित्या सोशल मीडिया अकाउंटवरील तृप्ती जाधव हे नाव काढून तृप्ती अक्कलवार असे केले आहे. तिने तिचे जाधव आडनाव काढून अक्कलवार हे माहेरचे आडनाव लावले आहे. तृप्तीच्या या कृतीमुळे आता नक्कीच सिद्धार्थ आणि तृप्तीचा घटस्फोट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच मागील काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ जाधव आपल्या मुलींना घेऊन ट्रीपला गेला होता. त्यावेळी सिद्धार्थने फक्त आपल्या मुलींसोबतचेच फोटो शेअर केले होते. या सर्व फोटोंमध्ये त्याची पत्नी तृप्ती कुठेही दिसली नाही.

गेल्या दोन वर्षापासून दोघांमध्ये दुरावा

 

View this post on Instagram

 

A post shared by Trupti V Akkalwar (@truptiakkalwar)

 सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून सिद्धार्थ आणि तृप्ती एकत्र राहत नाहीत. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

२००७ मध्ये झालं होतं लग्न

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

 सिद्धार्थ आणि तृप्तीचे २००७ मध्ये एकमेकांच्या पसंतीने लग्न केले होते. सिद्धार्थ आणि तृप्तीने ‘झलक दिखला जा’ या शोमध्ये देखील भाग घेतला होता. यांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत. १५ वर्ष सुखी संसार केल्यानंतर आता दोघेही विभक्त होणार असल्याची बातमी कळताच सिद्धार्थच्या चाहत्यांना मोठ्ठा धक्का बसला आहे.

 


हेही वाचा :‘सांसों में तूफानों का डेरा, निगाहें जैसे चील का पहरा’… रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ चित्रपटाचा टीझर रिलीज