हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा चाहता वर्ग बराच मोठा आहे. ‘ये हे मोहोब्बतें’ या मालिकेतून तिने घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनांत जागा मिळवली. यानंतर आता दिव्यांका लवकरच ओटीटीवर आपल्या अभिनयाची कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. यानिमित्त तिने एका नामांकित वृत्त वहिनीला मुलाखत दिली. ज्यामध्ये तिने स्वतःसोबत घडलेल्या मनी स्कॅमच्या प्रसंगाची माहिती दिली. आपल्याला CA ने 12 लाख रुपयांना कसे गंडवले, याची आपबिती तिने सांगितली.
दिव्यांका त्रिपाठीने एका नामांकित वृत्त वाहिनीला मुलाखत देतेवेळी सांगितले की, ‘बनूं मैं तेरी दुल्हन ही माझी पहिली मालिका होती. हा स्कॅम त्यावेळचा आहे. या मालिकेच्या सेटवर एक CA होता. जो काही कलाकारांचे अकाऊंट पाहत होता. तो दुसऱ्या शहरात रहायचा. त्यावेळी मी 20 ते 24 तास काम करायचे. ज्यामुळे माझ्या कामांसाठी दुसरा कोणता CA शोधणं मला शक्य नव्हतं. त्यावेळी त्यांनी माझ्याकडून काही FD बनवून घेतल्या होत्या. तुम्ही काहीच खर्च करत नाही. मग, तुमच्या टॅक्सचे काय होणार? असे तो वारंवार म्हणत असे. त्यावेळी त्याने FD बनवून माझ्याकडून 4 चेकवर सह्या घेतल्या होत्या. शिवाय काही फॉर्मसुद्धा भरून घेतले होते. ज्यावर माझं नाव होतं आणि खाली बँकेचं नाव होतं. पण, बाकीचे पेज रिकामी होते. त्यांनी मला सांगितलं बाकीचे पेज ते भरणार आहेत’.
मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि फॉर्मसह बाकी पेजवर 2 ते 3 ठिकाणी माझं नाव टाकलं. सोबत सह्यासुद्धा केल्या. पण, त्यानंतर तो माणूस माझे 12 लाख रुपये घेऊन चक्क गायब झाला. त्यावेळी मी फार कमवत नव्हती आणि अशातच एक- दोन वर्षात मी जे कमावलेले ते घेऊन हा माणूस लंपास झाला. मी त्याला कितीतरी फोन केले पण काही उपयोग झाला नाही. त्यानंतर मी माझ्या एका मित्राला त्याच्या शहरात पाठवलं आणि त्याच्याकडून 4 चेक सही करून घेतले. पण त्यापैकी 3 चेक बाऊन्स झाल्याने माझं तब्बल 9 लाखांचं नुकसान झालं. मी चेक बाऊन्सची तक्रार केली होती. पण, तारखांशिवाय मला काहीच मिळालं नाही. त्यात माझ्या वकिलाने मला सांगितलं की तुमची फाईल गायब झाली आहे. ज्यातून मला समजलं माझा वकील विकला गेला होता. शेवटी मी प्रयत्न सोडून दिले’, असे दिव्यांकाने सांगितली आहे.
हेही पाहा –