घरमनोरंजनDiwali 2021: दिवाळीच्या मुहूर्तावर आलिया- रणबीरने घेतलं कालिमातेचं दर्शन

Diwali 2021: दिवाळीच्या मुहूर्तावर आलिया- रणबीरने घेतलं कालिमातेचं दर्शन

Subscribe

बॉलिवूड (Bollywood)अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)या क्यूट कपल बद्दल जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक असतात. लवकरच दोघेही विवाह बंधनात अडकणार असल्याचे बोलले जातंय. नुकतचं रणबीर आणि आलियाला एकत्र स्पॉट करण्यात आलं. दोघेही दिवाळीच्या मुहूर्तावर कालीमातेचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते.(Diwali 2021: Alia Bhatt and Ranbir Kapoor celebrate the festival together)

मुंबईतील नॉर्थ बॉम्बे पब्लिक दुर्गा पूजा कमिटीच्या पंडालमध्ये कालीमातेच्या पूजेसाठी आलिया-रणबीरने हजेरी लावली होती. यावेळी दोघांसोबत लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक आयान मुखर्जीही उपस्थित होता. आलिया-रणबीर दोघेही ट्रेडिशनल लूकमध्ये अत्यंत सुंदर दिसत होते. आलियाने निळ्या रंगाचा सब्यसाची डिझायनरचा लेहंगा परिधान केला होता.तर रणबीरने देखील गडद निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. दर्शन झाल्यानंतर दोघांनी एकत्र फोटोशूट केलं तसेच आलियाने हे फोटो तिच्या अधीकृत सोशल मीडिया अकांऊटवर  पोस्ट केले आहेत. ‘आणि थोडसं प्रेम…दिवाळीच्या शुभेच्छा’ असं कॅप्शन देत आलियाने चाहत्यांसोबत हे रोमँटीक फोटो शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

- Advertisement -

रणबीर- आलियाच्या रिलेशनशिपबाबत सांगायचे झाल्यास गेली 3 वर्षे ते एकमेकांना डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच येत्या डिसेंबर महिन्यात दोघेही लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. मात्र याबाबत दोघांनी अधीकृतपणे घोषणा केली नाहीये. ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये दोघेही पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहे. तसेच गंगूबाई काठियावाडी,रॉकी और राणी की प्रेम काहीनी .RRR हे आलियाचे आगामी चित्रपट आहेत.

- Advertisement -

हे हि वाचा –  Diwali 2021: तेजश्रीचा दिवाळीत स्पेशल पारंपरिक लूक

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -