घरताज्या घडामोडीDiwali 2021: मित्राला देतोय प्रेमाचे सल्ले...

Diwali 2021: मित्राला देतोय प्रेमाचे सल्ले…

Subscribe

संकर्षणने दिवाळीच्या स्पेशल आठवणींबद्दल माय महानगरशी दिलखुलास गप्पा मारल्या

‘आम्ही सारे खवय्ये’ मधून घराघरात जाऊन रेसिपीज दाखवणारा ‘संकर्षण कऱ्हाडे’ आता ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत नायकाच्या मित्राची भूमिका साकारतोय. त्याने त्याच्या या प्रवासाबद्दल आणि दिवाळीच्या स्पेशल आठवणींबद्दल माय महानगरशी दिलखुलास गप्पा मारल्या

  • माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील भूमिके विषयी काय सांगशील ?

अभिनय हे माझ मूळ प्रेम आहे. निवेदन किंवा इतर गोष्टी ओघाने येतात. परंतु माझी तुझी रेशीमगाठ च्या माध्यमातून मला अभिनय करण्याची संधी मिळातेय. शिवाय ही मालिका आता खूप गाजतेय आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे खूप छान वाटत आहे.

- Advertisement -
  • मालिकेत ट्रॅक नुसार ज्या पद्धतीने यशला जशी त्याची लव्ह स्टोरी फुलवण्यात मदत करतोय तस रिअल लाईफ मधे केलय का?

नाही खरंतर रिअल लाईफ मध्ये मला मित्रांनी अशा बाबतीत मला मदत केली आहे. नाही खरतर रिअल लाईफ मध्ये मी अस कधी केल नाही याउलट मला मित्रांनी अशा बाबतीत मला मदत केली आहे.माझ्या लव्ह स्टोरी मध्ये पुढे जाण्यासाठी.

  • श्रेयस तळपदे आणि तुमच ऑफस्क्रीन बॉडिंग कस आहे?

खूपच छान आहे. आणि आमच्या या बॉडिंगच क्रेडिट श्रेयस आहे कारण मला सुरूवातीला थोड टेन्शन होतं कारण त्याचा अनुभव खूप मोठा आहे शिवाय त्याने हिंदी माधयमा मध्ये देखील काम केलय.पण पहिल्याच दिवशी श्रेयस सेटवरती आला आणि माझ्या खांद्यावर हात टाकला तिथेच आमची छान मैत्री झाली आणि त्या क्षणापासून जी मैत्री झाली ती छान झाली. पण काम करत असताना मी त्याचा खूप आदर करतो.

- Advertisement -
  • मायरा सेटवर असताना काय गमतीजमती घडतात? तिच आणि तुमच बॉडिंग कसं आहे?

मायरा सेटवर असली की वातावरण खूप गजबजलेल असत.ती मला कधीच संकर्षण दादा वगैरे म्हणत नाही .ती मला बॉस काका असच म्हणते कारण ते माझ मालिकेतल तिच्याशी असलेल नात आहे. ती मेकअप रूममध्ये आली की कधीच हाय हॅलो करत नाही थेट सीनमधली वाक्य म्हणायला सुरूवात करते.पण तिच्याशी ट्यूनिंग खूप छान आहे.

  • दिवाळीचे यावर्षी चे काय स्पेशल प्लॅनिंग आहेत? आणि दिवाळी ची खास आठवण सांगाल का?

यावेळी आम्हाला दोन दिवस दिवाळीची सुट्टी आहे. त्यामुळे घरच्यांसोबत दिवाळी साजरी करणार आहे. दिवाळीची आठवण म्हणजे आम्ही एका वर्षी नाटकाच्या प्रयोगासाठी मेलबन ला होतो तेव्हा ज्या घरी आम्हीराहिलो तिथे आम्हाला कणकेच्या दिव्यांनी ओवाळल आणि घरापुढे छान रांगोळी काढली. मराठी रसिक प्रेक्षक जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी ते खूप प्रेम करतात याचा प्रत्यय तेव्हा आला.


हेही वाचा – आयुष्मान खुराना-रकुल प्रीत सिंग फेम ‘डॉक्टर जी’ प्रेक्षकांच्या भेटीला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -