घर मनोरंजन दिवाळी सेलिब्रेशनदरम्यान जया बच्चन पत्रकारांवर संतापल्या, पाठलाग करत म्हणाल्या...

दिवाळी सेलिब्रेशनदरम्यान जया बच्चन पत्रकारांवर संतापल्या, पाठलाग करत म्हणाल्या…

Subscribe

देशभरात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. यात बॉलिवूड स्टार्सही त्यांच्या कुटुंबियांसह आणि मित्रमंडळींसोबत दिवाळी सेलिब्रेशन करताना दिसले. सगळीकडेच आनंदाचे वातावरण होते. पण दिवाळीच्या खास दिवशी जया बच्चन खूपच पत्रकारांवर काहीश्या संतापलेल्या दिसल्या. जया बच्चन पत्रकारांवर भडकतानाचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

जया बच्चन का भडकल्या?

जया बच्चन अनेकदा पापाराझींवर रागावताना दिसतात. फोटो क्लिक केल्याने जया बच्चन अनेकदा पापाराझींना फटकारताना दिसतात. पण दिवाळीच्या खास, आनंदाच्या प्रसंगीही जया बच्चन पापाराझींवर नाराज होताना दिसल्या. मात्र यामागचे कारण काय आहे असे विचारले जात आहे.

- Advertisement -

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या घराबाहेर पापाराझी बच्चन कुटुंबीयांचे दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी जमले होते. पण जया बच्चन यांना घराबाहेर अशाप्रकारे पापाराझींनी जमणे पसंत नव्हते. मग काय, जया बच्चन स्वत: घराबाहेर पडल्या आणि त्यांनी पापाराझींचा पाठलाग करत त्यांना चांगलेच फटकारले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

- Advertisement -

जया बच्चन यावेळी कॅमेरा पर्सनवर रागवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र जया बच्चन यांचा पापाराझींवरचा राग चाहत्यांना आवडला नाही. जया बच्चन यांनी पापाराझींसोबत असे वागू नये, असे अनेक युजर्सचे मत आहे.

काही दिवसांपूर्वीही जया बच्चन पापाराझींवर ओरडताना दिसल्या होत्या. जया बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर तिचा आगामी चित्रपट रॉकी आणि राणीची प्रेमकथा आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. करण जोहर बनवत आहे. धर्मेंद्र, रणवीर सिंग, आलिया भट्ट, शबाना आझमी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोली दौऱ्यावर, नक्षलग्रस्त भागातील पोलिसांसोबत दिवाळी करणार साजरी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -