घरमनोरंजनमिथून चक्रवर्तींच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली माहिती

मिथून चक्रवर्तींच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली माहिती

Subscribe

जेष्ठ अभिनेते आणि राजकारणी मिथून चक्रवर्ती यांना शनिवारी कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिथून यांना छातीत दुखू लागलं आणि अस्वस्थता जाणवू त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, नुकतीच डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे.

मिथून चक्रवर्तींच्या प्रकृतीत सुधारणा

Mithun Chakraborty Is Better, I Met Him In Hospital,' Director Pathikrit  Basu Talks EXCLUSIVE To Times Now | Hindi News, Times Now

- Advertisement -

मिथून यांच्या प्रकृतीबाबत सांगताना डॉक्टरांनी सांगितले की, मिथून यांना ब्रेनस्ट्रोक झाला असून त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे. त्यांना आता आयसीयूमधून बाहेर काढण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर न्यूरो-फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टसह डॉक्टरांच्या पथकाद्वारे त्यांची देखरेख केली जात आहे. दरम्यान, मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीची बातमी कळताच त्यांच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिथुनदा बरे व्हावेत म्हणून त्यांचे चाहते प्रार्थनाही करत आहेत.

मिथून चक्रवर्ती पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित

मिथून चक्रव्रर्ती यांना पद्म भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेले पद्म भूषण आणि पद्म विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. या पुरस्कारबद्दल आनंद व्यक्त करत, हा बहुमान मिळाल्याने मी अत्यंत आनंदी आहे, अशी प्रतिक्रिया मिथून यांनी दिली होती. “मी खरंतर सगळ्यांनाचे आभार मानू इच्छितो. मी स्वत:साठी कोणाकडे कधी काही मागितलं नाही, पण मला न मागताच बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय आनंद आहे.”

- Advertisement -

 


हेही वाचा : ‘बिग बॉस 17’ च्या पार्टीमध्ये अरबाज-शूराची जबरदस्त एन्ट्री; व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -