घरमनोरंजनDolly Sohi : अभिनेत्री डॉली सोहीने दिली कॅन्सरशी यशस्वी झुंज!

Dolly Sohi : अभिनेत्री डॉली सोहीने दिली कॅन्सरशी यशस्वी झुंज!

Subscribe

डॉली सोही ही छोट्या पडद्यावरील प्रसिध्द अभिनेत्री आहे. डॉलीने ‘तुझ संग प्रीत लगाई सजना’ या मधून टीव्ही इंडस्ट्रीतमध्ये पदार्ण केले. यानंतर तिने हिटलर दीदी, देवों के देव… महादेव, कलश, कुमकुम भाग्य, सिंदूर की कीमा यासह अनेक मालिकांमध्ये अलीकडेच ‘परिणिती’ या मालिकेद्वारे टेलिव्हिजनवर परतली आहे. अभिनेत्री सोहीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिला एका आजाराने ग्रासल्याची माहिती दिली आहे. ही पोस्ट समोर आल्यानंतर त्याचे चाहते दु:खी झाले आहेत आणि लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा देत आहेत.

डॉली इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तीने सांगितले की तिला तुम्हा सर्वांचे खुप खुप आभार, तुमचे प्रेम आणि माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद, आयुष्यात चढ- उतार येतात, पण तुमच्यात लढण्याची ताकद असेल, तर तुमचा प्रवास खुप सोपा होतो. तुम्हाला तुमचा प्रवास कसा करायचं आहे हे तुम्हीच ठरवायचं.

- Advertisement -

अभिनेत्री डॉलीने कॅन्सर आणि आजाराशी दिलेल्या लढ्याबदल तीने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. डॉलीने सांगिलतलं की, सुरूवातीला तिला लक्षणे आणि कॅन्सर झाल्याच समलं. पण या आजाराबाबत ६ ते ७ महिन्यांपूर्वीच माहिती मिळाली. सुरूवातीला याकडे दुर्लक्ष केलं. वेदना सहन न झाल्याने तिने डॉक्टरांकडे जाऊन चाचण्या करून घेतल्या.

चाचणीनंतर तिला गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिली. असं डॉली ने सांगितले. पण त्यानंतरच्या चाचण्यांमधून तिला सर्वाइकल कॅन्सर झाल्याचं समोर आलं. तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. अभिनेत्रीने कॅन्सरची लढाई जिंकल्याने तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -