बॉलिवूड अभिनेत्री पंगा गर्ल कंगना रनौतने पुन्हा एकदा दिग्दर्शक, निर्माता करण जोहर वर निशाणा साधला आहे. ‘दोस्ताना 2’ या आगामी चित्रपटामधून अभिनेता कार्तिक आर्यनला काढून टाकल्याच्या चर्चा सध्या बॉलिवूड मध्ये जोरदार रंगत आहेत. अशातच कंगना ने कार्तिकची बाजूघेत करण जोहरला ट्विटर अकाऊंट वरुन कार्तिकला गळफास घेण्यास भाग पाडू नका असे ट्विट केले आहे.
Kartik has come this far on his own, on his own he will continue to do so, only request to papa jo and his nepo gang club is please leave him alone like Shushant don’t go after him and force him to hang himself. Leave him alone you vultures, get lost chindi nepos… https://t.co/VJioWHk38i
— Kangana Ranaut (@KanganaTeam) April 16, 2021
कार्तिकने आपल्या मेहनतीच्या तसेच अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड मध्ये आपल स्वतंत्र अस स्थान निर्माण केल आहे. ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिल नाही. अशातच बिग बजेट चित्रपट ‘दोस्ताना 2’ मधून कार्तिकला बाहेर काढल्या नंतर कंगनाने कार्तिकची बाजू घेतली आहे. कंगना लिहते की ”कार्तिक इथपर्यंत त्याच्या मेहनतीच्या बळावर पोहचला आहे. आणि तो असाच पुढे जात राहील. पापा जो म्हणजेच करण जोहर आणि त्याच्या नेपोटीजम गॅंगला मी विनंती करू इच्छिते कार्तिकला एकट सोडा,सुशांत सिंग राजपूत प्रमाणे त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडू नका, गिधाडांनो त्याला एकट सोडा,निघून जा तुम्ही”
कार्तिकला धीर देत तू घाबरू नकोस असे म्हणत नेपोटीजम विरोधात कडक शब्दात टीका केली आहे. तसेच सुशांतच्या बाबतीत सुद्धा या गॅंग ने अशीच वागणूक दिली तो आमली पदार्थांच्या आहारी तसेच अनेक अफवा त्याच्या बाबतीत पासरवण्यात आल्या होत्या. स्वत:वर विश्वास ठेव आम्ही तुझ्या सोबत आहोत अशा प्रकारचे ट्विट करून बॉलिवूड मधील घराणेशाही पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
हे हि वाचा – करण जोहरच्या ‘दोस्ताना २’मधून कार्तिकला केलं आऊट, पुढे कधीच काम न करण्याचं घेतलं वचन