9 सप्टेंबरला काय होईल हे माहीत नाही…करण जोहरला वाटतेय ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची काळजी

मागील अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, आता या चित्रपटांची वाईट अवस्था पाहून चित्रपट दिग्दर्शक करण जौहरला देखील ब्रह्मास्त्र चित्रपटावरून चिंता सतावत आहे

2022 मध्ये हिंदी चित्रपटांसाठी फारसं चांगलं नाही. काही मोजके चित्रपट सोडले तर अनेक दिग्गज कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात असफल झाले आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आमीर खान आणि करीना कपूरचा ‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. परंतु चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस होऊनही या चित्रपटाने 50 कोटींची कमाई देखील केलेली पाहायला मिळत नाही. इतकंच नाही तर अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ चित्रपटाने देखील अजून 35 कोटींची कमाई सुद्धा केलेली नाही.

मागील अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, आता या चित्रपटांची वाईट अवस्था पाहून चित्रपट दिग्दर्शक करण जोहरला देखील ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटावरून चिंता सतावत आहे. करणने या चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीला प्रोत्साहन देत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये करणने एक फोटो देखील शेअर केला आहे. ज्यात करणसोबत अयान मुखर्जी सुद्धा दिसून येत आहे.

करणने लिहिलं की…,

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये करण जौहरने लिहिलंय की, प्रेम एक खूप मजबूत आणि प्रेमळ भावना आहे. याला वाटल्यानंतर तुम्ही त्याचा अनुभव देखील घेऊ शकता. अयान मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तूला माझ्या मुलांबद्दल जे वाटतं, तेच मला तुझ्यासोबत देखील वाटतं. मी चांगलंच माहीत आहे की, तु ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटासाठी किती मेहनत घेतली आहेस आणि त्यासाठी तू तुझे किती वर्ष लावले आहेस. उद्या काय होईल किंवा 9 सप्टेंबरला काय होईल हे माहीत नाही, परंतु तुझी मेहनत आणि समर्पणाने आपण आधीच जिंकलो आहोत. फक्त तु झेप घेत राहा आणि तुझं लक्ष मोठं ठेव. तुझं स्वप्न प्रेम आहे, ज्याला जग लवकरच पाहिल. खूप प्रेम माझ्या मुला आणि हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

करणच्या या पोस्टवरून सहज लक्षात येत आहे की त्याला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाबाबत चिंता वाटत आहे. येत्या 9 सप्टेंबर रोजी ‘ब्रह्मास्त्र’ प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येतील.


हेही वाचा :बिपाशा बासू लवकरच होणार आई; बेबी बंपसह शेअर केले फोटो