‘आता missed Call नकोय त्यांना फोन करा’, मामाच्या जाण्याने भावूक पुष्करचे चाहत्यांना आवाहन

पुष्कर जोगचे चाहत्यांना भावनिक आवाहन

Don't miss the call now, call them, Marathi Actor Pushkar jog appeal to fans
'आता missed Call नकोय त्यांना फोन करा', मामाच्या जाण्याने भावूक पुष्करचे चाहत्यांना आवाहन

कोरोनाने अनेक जवळची माणसे हिरावून नेली आहेत. प्रत्येक जण आज या परिस्थितीतून जात आहे. अनेक जण आपले अनुभव सोशल मीडियामार्फत शेअर करत आहेत. अनेक सेलिब्रिटींचाही या समावेश आहेत. मराठी तसेच हिंदी कलाकार नेहमी चाहत्यांना कोरोना विषयी सतर्क राहण्यासाठी आवाहन करत असतात. या दिवसात सर्वांनी एकत्र येण्याची आणि एकमेकांना समजून घेण्याची, एकमेकांशी बोलण्याची वेळ आहे. मात्र बऱ्याचदा आपल्याला हे जमत नाही. मात्र ती व्यक्ती गेल्यानंतर आपल्याला पश्चाताप होतो. असाच अनुभव मराठी अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) याने सोशल मीडियावर शेअर केला. त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यात तो अत्यंत भावूक झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pushkar Suhas Jog (@jogpushkar)


पुष्कर सध्या एका वाईट प्रसंगातून जात आहे. पुष्करच्या सख्या मामाचे निधन झाले आहे. मामाने त्याला एक दिवस आधी फोन केला होता. मात्र पुष्कर फोन घेऊ न शकल्याने  त्याचे आणि पुष्करचे बोलणे होऊ शकले नाही. दुसऱ्या दिवशी मामा गेल्याची दु:खत बातमी पुष्करला कळली आणि पुष्कर हादरुन गेला. मी काल मामाला कॉल बॅक केला असता तर आमचे बोलणे होऊ शकले असते,असे पुष्करने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

त्याचबरोबर पुष्करने भावुक होऊन सर्वांना आपल्या जवळच्या माणसांची काळजी घ्या, ‘आता missed Call नकोय त्यांना फोन करा, जवळच्या माणसांची विचारपूस करा त्यांच्यासाठी तुम्ही आहात हे त्यांना सांगा. या काळात रुसवे फुगवे बाजूला ठेवून नातेवाईक, परिवार,मित्रमंडळींना मदत करा. कोणी कॉल किंवा मेसेज केला तर तो मिस करु नका, त्यांना कॉल बॅक करुन त्यांच्याशी बोला’, असे भवनिक पण महत्त्वाचे आवाहन पुष्करने त्याच्या चाहत्यांना केले आहे. पुष्करे दिलेला हा संदेश खरंच लाखमोलाचा आणि आयुष्यात जगताना विचार करायला लावणारा आहे.


हेही वाचा – समीक्षकांच्या कौतुकाची थाप मिळालेल्या ‘दिठी’चित्रपटाचा ट्रेलर रिलीज