‘माझ्या मुलीवर बलात्कार झालेला नाही’ दिशाच्या आई वडिलांनी दिली प्रतिक्रीया

‘माझ्या मुलीला बदनामकरून फायदा उचलू नका, तीच्या मृत्यूशी खेळू नका, दिशाच्या आई वडिलांची विनंती

sushant singh rajput case
सुशांत दिशा सालियन आत्महत्याप्रकरण

अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येपुर्वी त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियान हीने ९ जूनला आत्महत्या केली. त्यानंतर लगेचच १४ जूनला सुशांतने गळफास गेत आत्महत्या केली. मात्र आता सोशल मीडियावर आणि काही नेत्यांनी सुशांत आणि दिशा मृत्यूप्रकरण एकमेकांशी जोडलं आहे. तर या दोन्ही प्रकरणाचा एकमेकांशी काही संबंध नाही असं पोलिसांच म्हणणं आहे.

मात्र आजपर्यंत या प्रकरणात एकदाही प्रतिक्रीया न दिलेले दिशाच्या आई- वडिलांनी आज तक या हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. ‘माझ्या मुलीला बदनामकरून फायदा उचलू नका, तीच्या मृत्यूशी खेळू नका ती आमची एकूलती एक मुलगी होती. आम्ही आमच्या मुलीला गमावलं आहे. आता जे लोक तीची प्रतिमा मलिन करत आहेत. ते खरतच आम्ची छळवणूक करत आहेत.’

पुढे बोलताना दिशाची आई म्हणाली, मी देशातील लोकांना, मिडीयाला सांगते की या सगळ्या अफवा आहेत. या सर्व बातम्या खोट्या आहेत. मी माझ्या मुलीला गमावलं आहे. अशाप्रकारच्या बातम्या एक दिवशी आम्हालाही संपवतील. सुप्रीम कोर्टाने या चर्चांना थांबवायला हवं. अशी आम्ही विनवणी करतो.

दिशावर बलात्कार झालेला नव्हता. आम्ही दोनदा पोलिसांना जवाब दिलेला आहे. मालवणी पोलिसांकडे याचा रेकॉर्ड आहे. आम्ही पोस्टमोर्टम रिपोर्ट पाहिला आहे. मुंबई पोलीस योग्य रितीने काम करत आहेत. त्यांच्यावर माझा विश्वास आहे.

दिशा आणि रोहन रॉय यांच्या संबंधांबद्दल बोलताना दिशाची आई म्हणाली, लॉकडाऊननंतर हे दोघेही लग्न करणार होते. संपूर्ण लॉकडाऊन रोहन आमच्यासोबत होता. ४ जूनला रोहन एक ऑफर मिळाली. लॉकडाऊनमध्ये काम नव्हतं त्यामुळे या ऑफरमुळे दोघेही आनंदात होते. मालाडमधील हाऊश लोकेशनवर शूट फायनल केलं त्यासाठी दिशा आणि रोहन त्या ठिकाणी गेले. नेत्यांचे आरोप ऐकल्यावर खूप राग येतो. तीचे कोणाशीही संबंध नव्हते. ज्यांचे नाव घेतले जात आहे त्यांना ती भेटलीही नव्हती. सुशांत प्रकरणात माझ्या मुलीला ओढलं जात आहे. या लोकांवर आम्ही गुन्हा दाखल करू शकतो. पण हे लोकं नंतर आम्हाला जगू देणार नाहीत. असे दिशाच्या आई वडिलांनी सांगितले.