माझा प्रोजेक्ट खराब करू नका, मधुर भांडारकरांनी केली विनंती

नाही म्हणूनही करण जोहरने ते नाव त्याच्या कार्यक्रमाला दिले.

madhur bhandarkar calls out karan johar over title of the fabulous lives of bollywood wives
माझा प्रोजेक्ट खराब करू नका, मधुर भांडारकरांनी केली विनंती

काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सेलिब्रिटींच्या पत्नीवर आधारित वेब रिअॅलिटी शोचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या ट्रेलरमुळे वाद निर्माण झाला आहे. ‘फॅब्युलस लाईव्हस ऑफ बॉलिवुड वाईफ्स’ (Fabulous lives of bollywood wives)असे या कार्यक्रमाचे नाव आहे. करण जोहर याने या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. कार्यक्रमाच्या नावाचा निर्माते मधुर भांडारकर यांनी आक्षेप केला आहे. मधुर भांडारकर यांनी निर्माते करण जोहरला त्यांच्या कार्यक्रमाचे नाव बदलण्याची विनंती केली आहे.

करण जोहरने त्यांच्या कार्यक्रमाचे नाव चोरी केले आहे. मागूनही देत नाही म्हटल्यावर करणने थेट नाव प्रदर्शित केले, असा आरोप मधुर भांडारकर यांनी केला आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून दिली आहे. निर्माता करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी मधु भांडारकर यांच्याकडे ‘बॉलिवुड वाईफ्स’ हे नाव मागितले होते. या नावासाठी मधुर भांडारकर यांनी त्यांना नकार दिला कारण भांडारकरांचा ही त्याच नावाचा नवीन प्रोजेक्ट सुरू होणार होणार होता. मधुर भांडारकर नाही म्हणूनही करण जोहरने ते नाव त्याच्या कार्यक्रमाला दिले. यावर ‘माझा प्रोजेक्ट खराब करू नका. या शोचे नाव बदलण्याची मी नम्र विनंती करतो’, असे मधुर भांडारकर यांनी म्हटले आहे.

फॅब्युलस लाईव्हस ऑफ बॉलिवुड वाईफ्स या कार्यक्रमातून बॉलिवूड कलाकारांच्या पत्नीचे जीवन कसे आहे हे पाहता येणार आहे. या कार्यक्रमातचा ट्रेलर १३ नोव्हेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरमध्ये शाहरूख खान आणि त्याची पत्नी गौरी खान, संजय कपूर त्याची पत्नी,संजय कपूर दिसले होते. हा कार्यक्रम २७ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा – कपिल शर्मा होणार पुन्हा बाबा