घरताज्या घडामोडीनोबिता-शिजुकाचे झाले लग्न, चाहते झाले भावूक

नोबिता-शिजुकाचे झाले लग्न, चाहते झाले भावूक

Subscribe

भारतातील सर्वाधिक पाहिले जाणारे कार्टून शोमध्ये डोरेमॉनचे नाव नेहमीच असते. फुजिको फुजिओने तयार केलेली ही काल्पनिक व्यक्तिरेखा असलेली एक रोबोटिक मेल कॅट आहे. जे भविष्यातून २२ व्या शतकापर्यंतामध्ये येते. लहान मुले जेवढे डोरेमॉनवर प्रेम करतात तेवढेच ते डोरेमॉन ज्या घरात राहतो त्या मुलावरही प्रेम करतात. आपण ज्या मुलाबद्दल बोलत आहोत तो दुसरा तिसरा कोणी नसून नटखट मुलगा नोबिता आहे. बऱ्याच काळापासून मुलांचे आणि मोठ्यांचे मनोरंजन करणाऱ्या डोरेमॉनमधील नोबिताला शिजुका किती आवडते हे प्रत्येकालाच माहित आहे. तो नेहमी शिजुला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो. काही वेळेला दोघे भांडतातसुध्दा, पण तरी डोरेमॉन, शिजूका आणि नोबिता चांगले मित्र आहेत. पण आता डोरेमॉनच्या या कहाणीला नवी कलाटणी मिळणार आहे.

आता वेळे आली आहे, डोरेमॉनची कहाणी पुढे घेऊन जाण्याची, त्यामुळे लवकर डोरेमॉन आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये नोबिता आणि शिजुकाचे लग्न दाखवले आहे. २०२१मध्ये प्रदर्शित झालेला याच्या सिक्वलचे नाव ‘Stand by Me Doraemon 2’ होणार आहे.

- Advertisement -

पहिला पार्टमध्ये नोबिता आणि डोरेमॉनची पहिली भेट आणि त्याच्या Adventureवर होता. आता दुसरा पार्ट नोबिताची बालपणीची मैत्रिण शिजुकासोबतच्या लग्नाबाबत असणार आहे. हा आगामी चित्रपट नोव्हेंबर २०२० मध्ये जपान येथे प्रदर्शित झाला होता आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये इंडोनिशियामध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. याबाबत सीबीआय पिक्चर्सने ट्विटवर शेअर केले आहे आणि यामुळे सोशल मीडियावर नोबिता आणि शिजुकाचे लग्न ट्रेंड होऊ लागले आहे. हे कार्टून आवडणाऱ्या कोट्याहून अधिक चाहत्यांनी सोशल मीडियावर ट्विट करून भावनिक पोस्ट शेअर केल्या आहेत.

चाहत्यांनी काय केल्या आहेत भावनिक पोस्ट पाहा…

- Advertisement -


हेही वाचा – ‘तांडव’ वेबसीरिजचा वाद शिगेला; यूपी पोलीस मुंबईत दाखल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -