घरताज्या घडामोडी'दोस्ताना २'मध्ये कार्तिक आर्यनची जागा घेणार 'हा' अभिनेता

‘दोस्ताना २’मध्ये कार्तिक आर्यनची जागा घेणार ‘हा’ अभिनेता

Subscribe

काही दिवसांपूर्वी ‘दोस्ताना २’ (Dostana 2) चित्रपटातून अभिनेता कार्तिक आर्यनला बाहेर काढल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर एकच चर्चा रंगली ती म्हणजे आता ‘दोस्ताना २’ चित्रपटात कार्तिकची जागा कोण घेणार? पण आता ट्रेड एनालिस्टनुसार आता कार्तिक आर्यनची जागा बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार घेऊ शकतो अशी चर्चा रंगली आहे. निर्माता करण जोहरने अक्षय कुमारकडे या चित्रपटाबाबत मदत मागितली असल्याचे अनेक माध्यमातून सांगण्यात आले आहे.

करण जोहर आणि अक्षय कुमार खूप चांगले मित्र आहेत. करण आणि अक्षयने मिळून गुड न्यूज (Good News) चित्रपट केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप हिट झाला होता. आता करण अक्षयसाठी चित्रपटच्या स्क्रिप्टमध्ये बदल करण्यास तयार आहे.

- Advertisement -

दरम्यान दोस्ताना रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सोबत लक्ष्य लालवानी दिसणार आहे. २०१८मध्ये आलेला ‘दोस्ताना’ चित्रपटाचा हा सीक्वल आहे. या दोस्ताना चित्रपटात अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम आणि प्रियांका चोप्रा प्रमुख भूमिकेत होते.

अक्षयच्या येणाऱ्या चित्रपटाबद्दल बोलायचे गेले तर यामध्ये ‘रक्षा बंधन’ सामील आहे. याशिवाय ‘बच्चन पांडे’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘राम सेतु’मध्ये अक्षय दिसणार आहे. पण आता ‘दोस्ताना २’ मघ्ये कार्तिक आर्यनची जागा अक्षय कुमार घेणार की नाही याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. माहितीनुसार ‘दोस्ताना २’ मधील कार्तिक आर्यनची भूमिका २५-३० वयोगटातील असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या ‘दोस्ताना २’ च्या कास्टिंगवर सगळ्यांची नजर आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज्याबाहेर चित्रीकरण करणाऱ्या निर्मात्यांवर अमेय खोपकर यांची नाराजी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -