घरमनोरंजन'एकदा काय झालं...'च्या निमित्ताने सलील कुलकर्णींनी सांगितली आजोबांची आठवण

‘एकदा काय झालं…’च्या निमित्ताने सलील कुलकर्णींनी सांगितली आजोबांची आठवण

Subscribe

या निमित्ताने सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या आजोबांच्या आठवणींची एक खास पोस्ट शेअर केली आहे.

मराठी चित्रपट सृष्टीमधील संगीत विश्वातलं आघाडीचं नाव म्हणजे डॉ. सलिल कुलकर्णी. आयुष्यावर बोलू काही या त्यांच्या अल्बमला सुद्धा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी(saleel kulkarni) ‘एकदा काय झालं’ या चित्रपटचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान या निमित्ताने सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या आजोबांच्या आठवणींची एक खास पोस्ट शेअर केली आहे.

हे ही वाचा – ”एका बाजूला हसू आणि दुसऱ्या बाजूला आंसू ;” रवी जाधवांचं राष्ट्रीय पुरस्कारावर स्पष्ट मत

- Advertisement -

डॉ. सलील कुलकर्णी9dr. saleel kulkarni0 यांनी नुकतीच यांच्या फेसबुक वरून एक पोस्ट शेअर केली आहे. ‘एकदा काय झालं’ याचित्रपटातील भीमरूपी या गाण्याची लिंक सलील कुलकर्णींनी शेअर केली आहे आणि त्याच निमित्ताने त्यांनी त्यांच्या आजोबांची एक खास आठवण सांगितली आहे.

डॉ. सलील कुलकर्णी यांची पोस्ट 

- Advertisement -

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना 

माझ्या वयाच्या ३ ऱ्या वर्षी माझ्या आजोबांनी हे स्तोत्र शिकवलं होतं .. तेव्हापासून ह्या स्तोत्राची मनामध्ये एक खास जागा आहे 
काही वर्षांपूर्वी “ भीमरूपी “ च्या अचानक पहिल्या काही ओळींना चाल सुचली .. आणि आजोबांचा आवाज , लहानपणीच्या गोष्टी , आमच्या देव्हाऱ्यातला हनुमानाचा फोटो .. असं सगळं आठवलं .. !! चाल सुचत गेली आणि त्याच सुमारास आमचा कवी मित्र समीर सामंत घरी आला होता. बोलतां बोलतां त्याला ह्यातल्या काही ओळी ऐकवल्या आणि अचानक वाटलं ,” स्तोत्र तर परमपवित्र आणि उच्च दर्जाचं काव्य आहे पण आत्ताच्या काळात समजा आपल्याला हनुमानाला साकडं घालायचं असेल .. तर काय ओळी म्हणू आपण ? समीर आणि मी हनुमान आणि हनुमानाच्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टी ह्यावर गप्पा मारल्या आणि त्याने दोन-चार दिवसांत ह्या अप्रतिम ओळी लिहिल्या ,“ विश्वासाची संजीवनी दे , दूर होऊ दे शंका .. द्वेषाची अन अविचाराची दहन होऊ दे लंका तू शुद्ध भाव दे भक्ती दे , अन्याय हाराण्या शक्ती दे .. दुष्ट वृत्ती संहार करत .. संचार करत ये हनुमंता …भीमरूपी .. महारुद्रा …”आणि पुढे …“ हृदयांना जोडणारा एक सेतू बांध तू , अंतरीच्या अंतरीचा महासागर लांघ तू … अशा ओळी समीरने लिहिल्या माझ्या धाकट्या भावासारखा असलेला माझा मित्र शुभंकर शेम्बेकर ह्याने अप्रतिम संगीत संयोजन केले आणि स्तोत्राचे पावित्र्य राखत लहान मुलांच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड केलं आणि “ एकदा काय झालं “ या गोष्टी सांगणाऱ्या माणसाच्या गोष्टीला … हनुमानाचा आशीर्वाद मिळाला … !!
लहानपणी सर्वात जास्त गोष्टी हनुमानाच्या ऐकल्या .. आणि आता आपल्या गोष्टीत हनुमानाचे स्तोत्र रेकॉर्ड करता आले ह्याचे प्रचंड समाधान आहे . डॉ. सलील कुलकर्णी यांची पोस्ट या शब्दांत सलील कुलकर्णी यांनी त्यांचा भावना व्यक्त केल्या. 

हे ही वाचा –  अशोक पत्कींच्या संगीत साजाने पुन्हा एकदा साकारतोय ‘श्यामची आई’ चित्रपट

‘एकदा काय झालं’ हा चित्रपट ५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुनीत राघवन, मुक्त बर्वे(mukta barve), डॉ. मोहन आगाशे(dr. mohan agashe), सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, उर्मिला कोठारे या उत्तम कलाकारांची फळी आहे.

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -