घरCORONA UPDATEडॉ. डॉन मालिकेचा पूर्ण सेट कोरोना युध्दांच्या मदतीला!

डॉ. डॉन मालिकेचा पूर्ण सेट कोरोना युध्दांच्या मदतीला!

Subscribe

देवदत्त नागे, श्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी अशा दिग्गज कलाकारांचे ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन झाले. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. नियमांमध्ये थोडी शिथिलता आणल्यामुळे,  पुन्हा एकदा चित्रिकरण सुरु झाले आहे. १३ जुलै पासून या मालिकेचे नवीन भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले. पण पडद्यावरील डॉक्टर डॉन आता खऱ्या आयुष्यात कोविड योद्ध्यांच्या मदतीसाठी सज्ज झाला आहे.

डॉक्टर डॉन या मालिकेच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या सेटमध्ये, हॉस्पिटलच्या सेटचा समावेश आहे. मालिकेत पाहायला मिळत असलेलं हे हॉस्पिटल, यापुढे कोविड सेंटर म्हणून वापरले जाणार आहे. लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणल्यानंतर, कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मीरा-भाईंदर परिसरात ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेतील हॉस्पिटलचे चित्रीकरण करण्यात येते. या महापालिकेला, कोविड सेंटरसाठी जागेची आवश्यकता होती. हॉस्पिटलचा सेट उभारलेला असल्याने, ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेच्या टीमकडे जागेविषयी मागणी करण्यात आली. संपूर्ण देश कोविड-१९च्या महामारीशी लढत असताना, मालिकेच्या टीमने सुद्धा कोविड योद्ध्यांना मदत करण्याची ही संधी सोडली नाही. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपलाही खारीचा वाटा असावा, यासाठी मालिकेचा सेट, महापालिकेच्या ताब्यात देण्यात आला आहे.

- Advertisement -

मालिकेच्या सेटचा वापर एका अत्यंत महत्त्वपूर्ण कामासाठी होणार असल्याने, टीममधील प्रत्येकच कलाकार खूप खुश आहे. नेहमी त्याच्या धुंदीत असणारा, राडे करणारा डॉक्टर डॉन, आता थेट कोविड योद्धयांच्या मदतीला धावून आलेला आहे. सध्या या मालिकेचं चित्रीकरण कर्जत येथे एका रिसॉर्ट मध्ये होतंय.


हे ही वाचा – लग्नानंतर नवरदेवाने केला नवरीच्या घरात गृहप्रवेश!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -