‘दृश्यम 2’च्या तुलनेत ‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’ची एन्ट्री ठरली फिकी

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ प्रदर्शित होऊन जवळपास 2 आठवड्यांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. मात्र, तरीही या चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने जवळपास 170 कोटींचा टप्पा पार केला आहे. दरम्यान, अशातच आता अभिनेता आयुष्मान खुरानाचा ‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’ चित्रपट देखील काल प्रदर्शित झाला. अनेकांच्या मते आयुष्यानच्या चित्रपटामुळे अजय देवगणच्या चित्रपटाची कमाई घसरली असती. मात्र, तसे काहीही झाले नाही. ‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’ चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षा ‘दृश्यम 2’च्या 15 व्या दिवसाची कमाई जास्त आहे.

‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’ चित्रपटाने कमावले इतके कोटी
आयुष्मान खुराना आणि जयदीप अहलावातच्या ‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी केवळ 1.50 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट जास्त कमी करु शकेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारचा कॅमियो देखील आहे.

अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ने कमावला करोडोंचा गल्ला
श्रिया सरन, अक्षय खन्ना आणि अजय देवगण यांचा ‘दृश्यम 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली आहे. 18 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 15.38 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 21.59 कोटींची कमाई केली. तर पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने 64 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील ‘दृश्यम 2’ने करोडोंची कमाई केली होती. 15 व्या दिवशी या चित्रपटाने 4.20 कोटी कमावले दरम्यान, आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण 167 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर जगभरातून या चित्रपटाने 232.45 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाची वाढती कमाई पाहून निर्माते देखील खूप खूश आहेत.

 

 


हेही वाचा :

तुम्ही माझ्या कपड्यांशी स्पर्धा करू शकत नाही… उर्फी जावेदचं सनी लियोनीला प्रत्युत्तर