Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 'दृश्यम 2' च्या यशाचा ‘भेडिया’ आणि ‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’ला फटका

‘दृश्यम 2’ च्या यशाचा ‘भेडिया’ आणि ‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’ला फटका

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ प्रदर्शित होऊन जवळपास 20 दिवस झाले आहेत. मात्र, तरीही या चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने जवळपास 194 कोटींचा टप्पा पार केला आहे. दरम्यान, अशातच आता अभिनेता आयुष्मान खुरानाचा ‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’ चित्रपट देखील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. अनेकांच्या मते अजय देवगणच्या चित्रपटामुळे आयुष्मानच्या चित्रपटाची कमाई मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे. फक्त आयुष्मानच्या चित्रपटाचीच नाही तर वरुण धवनच्या भेडिया चित्रपटाला देखील ‘दृश्यम 2’ मोठा फटका बसला आहे.

अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ने कमवला करोडोंचा गल्ला
श्रिया सरन, अक्षय खन्ना आणि अजय देवगण यांचा ‘दृश्यम 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली आहे. 18 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 15.38 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 21.59 कोटींची कमाई केली. तर पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने 64 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील ‘दृश्यम 2’ने करोडोंची कमाई केली होती. 15 व्या दिवशी या चित्रपटाने 4.20 कोटी कमवले. दरम्यान, आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण 194 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर जगभरातून या चित्रपटाने 280 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाची वाढती कमाई पाहून निर्माते देखील खूप खूश आहेत.

- Advertisement -

‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’ चित्रपटाने कमवले इतके कोटी
आयुष्मान खुराना आणि जयदीप अहलावातच्या ‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी केवळ 1.50 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 2.16 कोटी कमवले. शिवाय या चित्रपटाने आत्तापर्यंत केवळ 8.64 कोटी कमावले आहेत.

‘भेडिया’ने कमवले इतके कोटी
‘दृश्यम 2’मुळे वरुण धवनचा ‘भेडिया’ चित्रपटाच्या कमाईत घसरण पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 7.25 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 9.25 कोटींचा टप्पा पार केली. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 11 कोटी तर चौथ्या दिवशी 3.50 कोटींची कमाई होती. तसेच आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण 55 कोटींची कमाई केली.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘ईयर इन सर्च 2022’ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून, सुष्मिता सेनपर्यंत ‘या’ व्यक्तींचा समावेश

 

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -