घरताज्या घडामोडीदीपिका पादुकोणवर नेटिझन्स पेटले; एक सो एक मीम्स व्हायरल!

दीपिका पादुकोणवर नेटिझन्स पेटले; एक सो एक मीम्स व्हायरल!

Subscribe

दीपिका पादुकोणच्या नावाने सोशल मीडियावर असंख्य मीम्स आता व्हायरल होऊ लागले आहेत.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी निगडीत ड्रग्ज केसमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. या प्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. तसेच टॉप बॉलिवूड अभिनेत्रींची नावं समोर येत असतानाच आता दीपिका पादुकोणचे नाव देखील समोर आले आहे. सुरुवातीला तिचे नाव ऐकल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र, नेटिझन्सच्या क्रिएटिव्हिटीला देखील ऊत आल्याचे दिसून येत आहे. दीपिका पादुकोणच्या नावाने फुल्ल ऑन मीम्स आता व्हायरल होऊ लागले आहेत.

या प्रकरणी दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांना एनसीबीने समन्स बजावली आहे. आज, मंगळवारी त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दीपिका आणि आणि करिश्मा प्रकाश यांच्यातील २८ ऑक्टोबर २०१७ रोजीचे चॅट समोर आले आहे. यात ड्रग्जसंबंधीचा संवाद पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

- Advertisement -

काय आहे व्हायरल चॅट

दीपिका – तुमच्याकडे माल आहे?
करिश्मा – हो, पण घरी आहे. मी वांद्र्याला आहे. तू म्हणत असशील तर मी अमितला विचारू शकते.
दीपिका – हो…, प्लीज…
करिश्मा – अमितकडे आहे, तो घेऊन जातोय.
दीपिका – हॅश ना? वीड नाही.
करिश्मा – हो हॅश…, तू कोको कधीपर्यंत येत आहात?
दीपिका – ११.३०/१२.००. shal तिथे कधीपर्यंत आहे?
करिश्मा – त्याने कदाचित ११.३० म्हटले आहे, कारण त्याला १२ पर्यंत दुसरीकडे जायचे आहे.


हेही वाचा – Bollywood Drug Probe: दीपिकानंतर दीया मिर्झाचं नाव आलं समोर, NCB चौकशी करणार!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -