Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Drugs Case: एजाज खानला NCBकडून अटक, घरात सापडलेल्या गोळ्यांवर अभिनेत्याचा खुलासा

Drugs Case: एजाज खानला NCBकडून अटक, घरात सापडलेल्या गोळ्यांवर अभिनेत्याचा खुलासा

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये आणखीन एका अभिनेत्याचे नाव उघड झालं आहे. काल (मंगळावारी)बिग बॉस फेम अभिनेता एजाज खानला एनसीबीने (NCB) अटक केली आहे. एजाजच्या घरी काल संध्याकाळी धाड टाकण्यात आली होती, त्यादरम्यान काही गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. ड्रग्ज पेडलर शादाबा बटाटाच्या चौकशीतून एजाज खानचे नाव समोर आलं होते. आज एजाजला कोर्टात हजर करण्यात येणार असून त्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. यादरम्यान एजाज खानने घरात सापडलेल्या गोळ्यांबाबत खुलासा केला आहे.

एजाज म्हणाला की, ‘माझ्या घरी फक्त ४ झोपेच्या गोळ्या सापडल्या आहेत. माझ्या पत्नीचा गर्भपात झाला आहे आणि या गोळ्या एन्टीडिप्रेसस म्हणून ती घेत होती.’

- Advertisement -

राजस्थानहून मुंबई परताच एजाज खानला एनसीबीच्या टीमने एअरपोर्टवरून ताब्यात घेतले आणि त्यानंतर अटक करण्यात आली. एजाज खानवर बटाटा गँगमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. एनसीबीने टीम एजाजच्या अंधेरी आणि लोखंडवालमधील अनेक ठिकाणांवर छापेमारी केली.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी एनसीबीने मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर फारुख बटाटाचा मुलगा शादाब बटाटाला अटक केली होती. त्यावेळेस जवळपास २ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. शादाब बटाटावर मुंबईतील बॉलिवूड सेलिब्रिटींना ड्रग्ज सप्लाय करत असल्याचा आरोप लावला आहे. फारूखने आपल्या आयुष्याच्या सुरुवातील बटाटा विकत होता. यादरम्यान त्याचा अंडरवर्ल्डच्या काही लोकांशी संपर्क झाला. आजच्या तारखेला तो मुंबईतला सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर आहे. या ड्रग्ज सप्लायरचे कामकाज आता त्याचे दोन मुलं सांभाळत होते.


हेही वाचा – माधुरी दीक्षितच्या ‘डान्स दिवाने’ च्या सेटवर तब्बल १८ जणांना कोरोनाची लागण


 

- Advertisement -