घरमनोरंजनइंदिरा गांधींच्या बायोपिकसाठी विद्या बालनने घेतला 'हा' निर्णय

इंदिरा गांधींच्या बायोपिकसाठी विद्या बालनने घेतला ‘हा’ निर्णय

Subscribe

या बायोपिकरिता विद्या बालन प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे.

चित्रपटातील कसदार अभिनयशैलीने आपली ओळख बनवणारी अभिनेत्री विद्या बालन सध्या इंदिरा गांधींच्या बायोपिक वेब सिरीजमुळे चर्चेत आहे. या बायोपिकरिता विद्या बालन प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. या बायोपिकच्या कामाकरिता व्यग्र असल्याने याशिवाय इतर कोणतेच काम तिच्याकडे सध्या नाही हे समजते.

विद्या बालनकडे कोणतेच काम नसल्याने ती कोणतीही कथा, पटकथा ऐकण्यास तयार असते. परंतु आता या पासून लांब राहणं पसंत करत आहे. विद्या बालनचे बऱ्य़ाच दिग्दर्शकांसोबत चांगले संबंध असल्याने कोणत्याही चित्रपटाकरिता तिच्याशी संपर्क केला जातो, असे असताना ही विद्या बालन कोणत्याच नवीन चित्रपटाचा स्वीकार करत नाही.

- Advertisement -

पिंकविला यांच्या अहवालानुसार, विद्या बालन लवकरच इंदिरा गांधी यांच्या जीवनावर येत असलेल्या वेब सिरीजच्या निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ही वेब सिरीज सागरिका घोष यांच्या इंदिरा: इंडियाज मोस्ट पावरफुल प्राइम मिनिस्टर यावर आधारित आहे. बऱ्याच काळापासून इंदिरा गांधी यांची भूमिका विद्या बालनला साकारायची होती. त्यामुळे विद्याने इतर दुसऱ्या कामापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. या वेब सिरीज करिता विद्या सिरीजच्या टीमला रोज भेटत आहे. या संपुर्ण प्रक्रियाचा एक ती भाग आहे. म्हणून ती अधिक वेळ या चित्रपटाकरिता देत आहे.

- Advertisement -

तसेच, विद्या बालन मिशन मंगल या चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, तापसी पन्नू, सोनाक्षी सिंहा आणि निथ्या मेनन यांच्या प्रमुख भूमिका असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जगन शक्ती करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -