Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन सिन्नर तालुक्यातील तहसीलदारांकडून ऐश्वर्या राय बच्चनला थकबाकीची नोटीस

सिन्नर तालुक्यातील तहसीलदारांकडून ऐश्वर्या राय बच्चनला थकबाकीची नोटीस

Subscribe

बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन एका अडचणीत सापडली असल्याची माहिती समोर आली आहे. ऐश्वर्याला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या तहसिलदारांनी नोटीस बजावली आहे. ऐश्वर्या रायची सिन्नर तालुक्याच्या ठाणगाव जवळील आडवाडीच्या डोंगराळ भागात जमीन आहे. त्या जमीचा कर तिने भरला नसल्याने तिला नोटीस बजावण्यात आली आहे.

खरंतर, नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील आडवाडी गावात पवन ऊर्जा कंपनीत ऐश्वर्याने गुंतवणूक केली आहे. आयकर बचत करण्यासाठी सुजलोन पवन ऊर्जा निर्मिती कंपनीत अनेक कलाकारांननी गुंतवणूक केल्या असून ही कंपनी ऐश्वर्याच्या जमीनीवर आहे. ऐश्वर्या राय बच्चनची सिन्नर तालुक्यातील ठाणगाव जवळील आडवाडीच्या डोंगराळ भागात 1 हेक्टर 22 आर जमीन आहे. मागील एक वर्षापासून तिने या जमीनीचा कर भरलेला नाही. एक वर्षाच्या कराची 21,970 इतकी रक्कम आहे. ही थकबाकी भरण्यासाठी ऐश्वर्याला नोटीस बजावण्यात आली आहे.

- Advertisement -

बच्चन कुटुंबात संपत्तीबाबत तणावाचे वातावरण
मागील काही दिवसांपासून अशी बातमी समोर येत होती की, अमिताभ बच्चन यांनी आपल्या संपत्तीच्या दोन वाटण्या होतील असे स्पष्ट केले होते. त्यामुळे बच्चन कुटुंबात संपत्तीबाबत तणावाचे वातावरण असल्याचं म्हटलं जात होतं. अमिताभ यांची पूर्ण संपत्तीचे दोन भागांपैकी एक भाग अभिषेकला तर दुसरा भाग मुलगी श्वेता बच्चनला दिला जाणार आहे.

 


- Advertisement -

हेही वाचा :

मी धार्मिक व्यक्ती नाही; शीख धर्माचा उल्लेख करत उर्फीने केलं नवं ट्वीट

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -