घरमनोरंजनआता ED कार्यालय बंद...मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आस्ताद काळेच्या पोस्टवर नेटकऱ्यांचं उत्तर

आता ED कार्यालय बंद…मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आस्ताद काळेच्या पोस्टवर नेटकऱ्यांचं उत्तर

Subscribe

या पोस्टमध्ये आस्ताद काळेने "महाराष्ट्राच्या राजकीय कथानकातलं एक उत्कंठावर्धक वळण..."असं लिहिलं आहे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय बंडखोर आमदार एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार यांनी बंड केल्यामुळे राज्यात गेल्या अनेक दिवसापासून राजकीय पेच निर्माण झाली होती. महाविकास आघाडी सरकारकडे पुरेसं पाठबळ नसल्याने उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयानंतर भाजप नेत्यांनी सेलिब्रेशन केले. या सर्व प्रकरणावर अनेक माध्यमातून आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारही आपलं मत मांडत आहेत.

आता अशीच एक पोस्ट अभिनेता आस्ताद काळे याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. आस्ताद काळे अनेकदा अनेक मुद्दयांवर आपले मत मांडत असतो. दरम्यान आस्तादने उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एक पोस्ट शेअर केली आहे.

- Advertisement -

या पोस्टमध्ये आस्ताद काळेने “महाराष्ट्राच्या राजकीय कथानकातलं एक उत्कंठावर्धक वळण…” असं लिहिलं आहे. आस्तादच्या या पोस्टवर नेटकरी अनेक कमेंट करू लागले आहेत. त्यातील एकाने कमेंटमध्ये लिहिलंय की, महाराष्ट्रातील ED कार्यालय आता बंद होतील…आता ED वाले सुद्धा बेरोजगार..” अश्या अनेक कमेंट आस्तादच्या पोस्टवर येऊ लागल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान आता महाविकास आघाडीमधील ४८ आमदारांनी बंड केल्यानंतर सरकार अल्पमतात आले, त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ३० जून रोजी बहुमत घेण्याचे आदेश दिले होते. या निर्णयावरून शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घातली होती.मात्र बहुमत चाचणी निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी होईल असं म्हटलं. त्यानंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाइव्ह येऊन राजीनामा जाहीर केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण केला. मात्र महाविकास आघाडीमधील ४८ आमदारांनी बंड केल्यानंतर सरकार अल्पमतात आले, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला.


हेही वाचा :तिसरी घंटा झाली… उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदेची पोस्ट

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -