घरताज्या घडामोडीPanama Papers Leak: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला ईडीचा समन्स

Panama Papers Leak: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला ईडीचा समन्स

Subscribe

पनामा पेपर्स लीक (Panama Papers Leak) प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. ईडीने चौकशीसाठी ऐश्वर्या रायला समन्स बजावला आहे. यापूर्वी ऐश्वर्या रायला दोन वेळा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, परंतु दोन्ही वेळेला चौकशी पुढे ढकलण्याची विनंती केली होती. पनामा पेपर्स लीक प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर ही विनंती केली गेली होती.

- Advertisement -

ईडीने ऐश्वर्याला फेमा प्रकरणात समन्स केला होता. ९ नोव्हेंबरला प्रतीक्षा म्हणजे बच्चन कुटुंबियांच्या राहत्या घरी हा समन्स पाठवला होता. १५ दिवसात याचे उत्तर मागितले होते. त्यानंतर ऐश्वर्याने ई-मेलद्वारे उत्तर दिले होते.

काय आहे पनामा पेपर्स लीक प्रकरण? 

पनामा पेपर्स लीक प्रकरणात एका कंपनीचे (Mossack Fonseca) अधिकृत कागदपत्र लीक झाले होते. हा डेटा जर्मन वृत्तपत्र Süddeutsche Zeitung (SZ) ने पनामा पेपर्स मधून ३ एप्रिल २०१६ साली जाहीर झाला होता. यामध्ये भारतासह २०० देशांमधील राजकारणी, व्यावसायिक, सेलिब्रिटींची नावे होती. ज्यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप लावण्यात आले होते. यामध्ये १९७७ पासून ते २०१५ अखेरिसपर्यंतची माहिती दिली होती. यात ३०० भारतीयांचा समावेश होता. यामध्ये ऐश्वर्या व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, अजय देवगण यांच्याही नावांचा समावेश होता. तसेच यामध्ये देशाचे माजी सॉलिसिटर जनरल आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील हरीश साळवे, फरारी उद्योगपती विजय मल्ल्या आणि मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार इकबाल मिर्चा यांची नावे होती.

- Advertisement -

पनामा पेपर्स लीक प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते. त्यानंतर केंद्र सरकारने या प्रकरणात मल्टी एजेन्सी ग्रुपची स्थापना केली होती. यामध्ये CBDT, RBI, ED आणि FIUला सामील होते. मग मल्टी एजेन्सी ग्रुपने याप्रकरणातील सर्व नावांची चौकशी करून अहवाल काळा पैशांचा तपासासाठी तयार करण्यात आलेली SIT आणि केंद्र सरकारला दिला.


हेही वाचा – क्वारंटाईनचे नियम मोडीत काढल्यानंतर आलियावर BMC करणार कारवाई ? झाला मोठा खुलासा


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -