‘एक हजारों में मेरी बहना है’ फेम तरला जोशींचे निधन

'एक हजारों में मेरी बहना है', साराभाई व्हर्सेस साराभाई अशा टेलिव्हिजनवरील विविध मालिकांमध्ये झळकलेल्या अभिनेत्री तरला जोशी यांचे निधन

ek hazaaron mein meri behna hai fame actress tarla joshi passes away
'एक हजारों में मेरी बहना है' फेम तरला जोशींचे निधन

‘एक हजारों में मेरी बहना है’, साराभाई व्हर्सेस साराभाई अशा टेलिव्हिजनवरील विविध मालिकांमध्ये झळकलेल्या अभिनेत्री तरला जोशी यांचे निधन झाले आहे. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री निया शर्मा यांनी जोशी यांच्या निधनाची सोशल मीडियावर माहिती दिली. त्यांच्या या निधनांची माहिती कळताच सोशल मीडियावर लोकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

निया शर्माने दिली निधनाची माहिती

निया शर्माने जोशींचे फोटो शेअर करत “RIP बडी बीजी तुमची आठवण येईल. तरला तुम्ही नेहमी बडी बीजी राहाल”, अशी माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

तरला यांच्याविषयी…

तरला जोशी या छोट्या पडद्यावरील ‘बा’ म्हणून चांगल्याच प्रचलित होत्या. तर बंदिनी या मालिकांमधून त्यांना खरी ओळख मिळाली होती. तसेच ‘एक हजार में मेरी बेहना है’ या मालिकेत त्यांनी अभिनेत्री निया शर्मा आणि क्रिस्टल डिसूझासोबत काम केले होते. त्याप्रमाणे साराभाई व्हर्सेस साराभाई, एक हजारो में मेरी बहना है अशा अनेक मालिकांमध्ये चांगलेच काम केले होते.


हेही वाचा – पर्ल पुरीच्या अटकेनंतर एकता कपूर आणि पीडितेच्या आईची कथित ऑडियो क्लिप व्हायरल