घरताज्या घडामोडीअर्जुन कपूर स्टारर 'एक व्हिलन रिटर्न' फेब्रुवारी २०२२ला झळकणार

अर्जुन कपूर स्टारर ‘एक व्हिलन रिटर्न’ फेब्रुवारी २०२२ला झळकणार

Subscribe

'एक व्हिलन' सिनेमाचा सिक्वल पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता

अभिनेता रितेश देशमुख आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या अप्रतिम अभिनय शैलीमुळे २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘एक व्हिलन’ हा सिनेमा चित्रपटगृहात गाजला. या सिनेमात सिनेकलाकारांनी सादर केलेल्या जबरदस्त अभिनय शैलीमुळे तसेच सुरेल संगितामुळे बॉलिवूडमध्ये या सिनेमाला वाहवा मिळाली. त्यामुळे चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा मनोरंजनाची झालर पसरवण्यासाठी दिग्दर्शक मोहित सुरी यांनी ‘एक व्हिलन रिटर्न’ हा सिनेमा सिनेविश्वात झळकवण्याचा पक्का निर्धार केला आहे. नुकताच अभिनेता अर्जुन कपूरने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘एक व्हिलन रिटर्न’ हा सिनेमा पुढच्या वर्षी ११ फेब्रुवारी २०२२ला सिनेरसिकांच्या भेटीला येणार असल्याची गोड बातमी दिली आहे.

या सिनेमाचे दिग्दर्शन मोहित सुरी करणार आहेत. तर बॅालिवूडचे नवखे सितारे ‘एक व्हिलन रिटर्न’ सिनेमात वेगवेगळ्या भूमिका साकारणार आहेत. यामध्ये अभिनेता अर्जुन कपूर, जॉन अब्राहम, अभिनेत्री तारा सुतारिया, दिशा पाटणी यांचा समावेश आहे. या सिनेमाचे टायटल पोस्टर अर्जुन कपूरने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. त्याचसोबत त्याने एक कॅप्शनही लिहिले आहे. या कॅप्शनमध्ये त्याने म्हटलंय, ‘या सिनेमाचा हिरोच ‘एक व्हिलन’ आहे.पुढच्या वर्षी फेब्रुवारीत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.’

- Advertisement -

अर्जुनने ही पोस्ट शेअर करताना त्याच्या सहकलाकारांना टॅग केले. या पोस्टला जॉननेही शेअर केले आहे. दरम्यान, दिशा आणि ताराने तुम्हाला तक्रार करण्याची संधी देणार नाही, अशी प्रतिक्रिया देत अर्जुनची एकप्रकारे खिल्लीच उडवली आहे. या सिनेमात निर्माता म्हणून भूषण कुमार आणि एकता कपूर काम पाहणार आहेत. सिनेमात अभिनेत्रींकडूनही व्हिलनची भूमिका साकारली जाणार आहे. यात प्रत्येक व्हिलनच्या भूमिकेत असलेले भिन्न पात्र जे एकमेकांशी संलग्न आहेत त्यांचा अभिनय वेगळ्या शैलीत झळकवण्याचा माझा आणि एकताचा प्रयत्न असणार आहे, असे मोहित सुरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.

या ‘एक व्हिलन रिटर्न’ सिनेमाचे टायटल ‘दो व्हिलन’ असे यापूर्वी ठेवण्यात आले होते. तसेच मुख्य भूमिकेसाठी आदित्य रॉय कपूरची निवड करण्यात आली होती. मात्र, आदित्य आणि मोहित यांच्यात सिनेमाच्या कामकाजावरून मतभेद होत असल्याने आदित्यने अखेर या सिनेमात काम न करण्याचा निर्णय घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, सिनेमाच्या टीमला एक तरुण अभिनेत्याला कास्ट करायचे होते, असा अभिनेता जो एका उमदा कलाकाराची भूमिका साकारेल. त्यामुळे आदित्यच्या जागेवर अर्जुनला संधी दिली असल्याची चर्चा चाहत्यामंध्ये आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘माझ्या नवऱ्यापासून लांबच राहा’ डिंपलने दिली होती रेखाला ‘वॉर्निंग’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -