‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, हाऊसफुल्ल ५०० प्रयोग

दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये 'एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा ५०० वा प्रयोग रंगला, उपस्थित मान्यवरांकडून आणि मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

अभिनेते प्रशांत दामले ( prashant damle) आणि अभिनेत्री कविता लाड – मेढेकर ( kavita lad – medhekar) यांची रंगमंचावरची जोडी प्रेक्षकांमध्ये सुपर हिट ठरली आहे. हे दोन्ही कलाकार सध्या एका लग्नाची पुढची गोष्ट ( eka lagnachi pudhachi goshta) या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. प्रशांत दामले यांची निर्मिती असलेल्या या नाटकाचे नुकतेच ५०० प्रयोग पूर्ण झाले. या नाटकाचा ५०० वा प्रयोग दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये ( dinanath mangeshkar natyagruh) पार पडला त्या निमित्ताने या प्रयोगाला सिनेसृष्टीतील आणि राजकारणातील अनेक दिग्गज उपस्थित होते. त्यांनी या नाटकासाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.

रंगभूमीवरच्या अनेक गाजलेल्या नाटकांपैकी एक नाटक म्हणजे एका लग्नाची पुढची गोष्ट. या नाटकांमधून प्रशांत दामले आणि कविता लाड – मेढेकर हि जोडी प्रेक्षकांसमोर आली. या नाटकाचा ५०० वा प्रयोग नुकताच दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडला. या प्रयोगाला राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख(amit deshmukha), अभिनेता रितेश देशमुख(ritesh deshmukh), भाजपा आमदार आशिष शेलार(ashish shelar) आणि जेष्ठ अभिनेते अशोक सराफ(ashok saraf) या मान्यवरांनी मुख्य उपस्थिती लावली होती.

नाटकासाठी मान्यवरांच्या शुभेच्छा –

मायबाप रसिक प्रेक्षकांचे प्रेम मिळवून रंगभूमीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले प्रशांत दामले(prashant damle) या चतुरस्त्र अभिनेत्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा या नाटकाच्या निमित्ताने रोवला गेला आहे. या नाटकाला आजवर मोठ्या प्रमाणात प्रेक्षक पसंती मिळाली आहे. ते बघता या नाटकाची यशस्वी वाटचाल पुढेही अशीच अविरत सुरू राहील, आणि या नाटकाचे असेच यशस्वी प्रयोय होत राहो अशा शुभेच्छा उपस्थित असलेल्या मान्यवरांनी दिल्या.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prashant Damle (@damleprashant)

 

‘एका लग्नाची पुढची गोष्ट'( eka lagnachi pudhachi goshta) नाटकात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले हे मुख्य भूमिकेत आहेत. तर या नाटकात कविता लाड – मेढेकर, अतुल तोडणकर, मृणाल चेंबुरकर, प्रतिक्षा शिवणकर, राजसिंह देशमुख, पराग डांगे यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. अद्वैत दादरकर (adwait dadarkar) यांनी नाटकाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे.

एका लग्नाच्या दर्जेदार गोष्टीला प्रेक्षकांनी अगदी कौतुकाने डोक्यावर उचलून घेतल आहे. मराठी रंगभूमीवरील प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर ही सदाबहार जोडी आणि त्यांची ‘ऑनस्टेज’ जुळलेली उत्तम केमिस्ट्री ‘एका लग्नाची पुढची गोष्ट'( eka lagnachi pudhachi goshta) या नाटकाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. सध्या रंगभूमीवर या नाटकाचे जोरदार प्रयोग सुरू आहेत. या नाटकाचा प्रत्येक प्रयोग हाऊसफुल्ल होत असतो. हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. कविता मेढेकर आणि प्रशांत दामले हे नाटकाप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. त्यांच्यात खूप चांगली मैत्री आहे जी रंगमंचावर सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळते.