घरताज्या घडामोडी'XXX 2': 'हिंदुस्तानी भाऊने मला बलात्काराची धमकी दिली आहे....'

‘XXX 2’: ‘हिंदुस्तानी भाऊने मला बलात्काराची धमकी दिली आहे….’

Subscribe

गेले काही दिवस आपल्या ‘ट्रिपल एक्स’ या सीरिजमुळे एकता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे. ‘अल्ट बालाजी’ हे नवीन वेबसीरिज अॅप सुरु केलं असून काही दिवसापूर्वी यातील ‘ट्रिपल एक्स’ या सीरिजमुळे एकता अडचणीत सापडली आहे. या अॅपवर प्रदर्शित झालेल्या सीरिजमध्ये भारतीय जवानांचा अपमान केल्याचं हिंदुस्तानी भाऊ या युट्युबरने म्हटलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर एकताला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र अखेर या प्रकरणी एकताने मौन सोडलं आहे.

- Advertisement -

नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत एकता ने आरोप, सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग आपलं मत मांडलं आहे. तसंच भारतीय जवानांचा अपमान केल्याचा आरोप करण्याविषयीदेखील तिने स्पष्टीकरण दिलं आहे. एकता कपूर म्हणते, ‘एक व्यक्ती म्हणून आणि एक संघटना म्हणून आम्ही भारतीय सैन्याबद्दल मनापासून आदर करतो. आपल्या देशासाठी आणि देशातील जनतेच्या सुरक्षेसाठी भारतीय लष्कर कायमच सज्ज आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी आमच्या मनात आदर आहेच. मात्र या सीरिजमध्ये दाखविण्यात आलेल्या काही दृश्यांमुळे मला ट्रोल केलं जात आहे, धमक्या दिल्या जात आहेत. आमचे कल्याण आणि सुरक्षिततेसाठी त्यांचे योगदान अफाट आहे. याबद्दल बोलले जाणारे दृश्य आम्ही आधीच हटवले आहे त्यामुळे आमच्या बाजूने कारवाई केली गेली. ट्रोल्सकडून होणारी गुंडगिरी आणि बलात्काराच्या धमक्यांविषयी मला काहीच बोलायचे नाही. कारण मला येणाऱ्या धमक्या अतिशय चुकीच्या आहेत. ”

एकताने सुरु केलेल्या ‘अल्ट बालाजी’ या वेबसीरिज अॅपवर काही दिवसांपूर्वी ‘ट्रिपल एक्स’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. या सीरिजच्या दुसऱ्या पर्वात एका भारतीय जवानाची कथा दाखवण्यात आली आहे. यामध्ये जवान सिमेवर असताना त्याची पत्नी इतर पुरुषांसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करताना दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे या कथेमुळे समाजात भारतीय जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरत असल्याचा आरोप प्रसिद्ध युट्युबर हिंदुस्तानी भाऊने केली होती. तसंच त्याने एकता विरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

या विषयीबोलताना एकता म्हणाली, जेव्हा आम्हाला कळले की एफआयआर दाखल करण्यात आला त्यावेळी आम्ही लगेचच ते सीन काढून टाकले. या साठी माझी टीम माफी मागण्यासाठी आणि लष्करी अधिकाऱ्यांची क्षमा मागायला तयार आहे. ज्यामुळे मला सर्वात जास्त चीड आली आणि ती म्हणजे सायबर-गुंडगिरी. आपण ‘देशभक्त’ असल्याचा विचार करणारे एक गृहस्थ, मला आणि माझ्या आईला शिवीगाळ करतात आणि नंतर सोशल मीडियावर मला उघडपणे बलात्काराची धमकी देत ​​होते. ‘


हे ही वाचा – परवानगी मिळूनही वृत्तपत्र घरी आलीच नाहीत कारण…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -