मुंबई : बिग बॉस सुरू झाल्यापासून या रिअॅलिटी शोला प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. बिग बॉस हे आधी दररोज टिव्हीवर दाखवले जायचे. पण लोकांची पसंती पाहता आणि OTT प्लॅटफॉर्ममुळे हा शो आता मोबाईलवर जिओ सिनेमावर दाखविण्यात येत होता. यंदा या शो चे दुसरे पर्व होते. 17 जूनपासून सुरू झालेल्या ‘बिग बॉस OTT सीझन 2’चा अंतिम सोहळा काल सोमवारी (ता. 14 ऑगस्ट) पार पडला. या पर्वामध्ये पहिल्यांदाच वाइल्ड कार्डने घरात येणारा स्पर्धक विजयी ठरला आहे. युट्यूबर एल्विश यादव याने ‘बिग बॉस OTT सीझन 2’ची ट्रॉफी आणि 25 लाख रुपये रोख रक्कम स्वतःच्या नावे केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे वाइल्ड कार्डने घरात येणारा स्पर्धक विजयी होणे, असे बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदात घडले आहे. (Elvish Yadav became the winner of ‘Bigg Boss OTT Season 2’)
हेही वाचा – मल्टीस्टारर “इंद्रधनुष्य” च्या चित्रीकरणाला लंडनमध्ये सुरुवात
एल्विश यादव याच्यासोबत अभिषेक म्हणजेच ‘फुक्रा इंसान’ अंतिम फेरीत पोहोचला होता. ज्यावेळी प्रेक्षकांनी दिलेल्या मतांच्या आधारावर एल्विशने हा शो जिंकला. या स्पर्धेमध्ये पाच जण अंतिम सामन्यामध्ये पोहोचले होते. यामध्ये बेबिका धुर्वे, अभिनेत्री पूजा भट्ट, मनिषा राणी या तीन महिला स्पर्धकांचा समावेश होता. सुरुवातीला या पाच जणांमधून बेबिका घराच्या बाहेर आली. त्यानंतर पूजा भट्ट आणि मग मनिषा घराच्या बाहेर पडल्या.
कोण आहे एल्विश यादव?
एल्विश यादव हा हरियाणामधील गुरुग्राम येथे राहणारा प्रसिद्ध यूट्यूबर आहे. 2016मध्ये एल्विशने त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. आज तो सोशल मीडिया स्टार आहे. त्याची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेज आहे. एल्विशचे स्वत:चे तीन यूट्यूब चॅनेल आहेत. या चॅनेलच्या माध्यमातून तो महिन्याला कोट्यावधी रुपयांची कमाई करतो. त्याचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत. एल्विशचे इन्स्टाग्रामवर 13 मिलियन फॉलोवर्स आहेत. या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एल्विश तब्बल 8 ते 10 लाख रुपयांची कमाई करतो. तर युट्यूबवर देखील त्याचे कोटींच्या घरात फॉलोअर्स आहेत.
एल्विशची स्वतःची मोठी सामाजिक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून तो गरजूंना मदत करतो. त्याला लग्जरी गाड्यांची आवड असल्याने त्याच्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये काही महागड्या गाड्या देखील आहेत. वयाच्या 25 व्या वर्षी एल्विशने मिळवलेली प्रसिद्धी आणि त्याला मिळालेले यश यामुळे तो अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. ‘सिस्टम है…’ म्हणत एल्विशने बिग बॉसच्या यंदाच्या पर्वामध्ये खूप लोकप्रियता मिळवली. त्याच्या खेळामुळे बिग बॉसचे सिस्टमही बदलून टाकले.
तर दुसऱ्या क्रमांकावर आलेला अभिषेक हा देखील एक युट्यूबर आहे. सुरुवातीपासूनच त्याने उत्तम खेळ खेळत घरातील स्पर्धकांमध्ये स्वतःची वेगळी छाप सोडली. त्याचा खेळ पाहता तोच यंदाच्या पर्वाचा विजेता होईल, असे मत व्यक्त करण्यात येत होते. परंतु, एल्विशने वाइल्ड कार्ड म्हणून घरात प्रवेश केल्यानंतर हे दोघेही तोडीस तोड निघाले. या दोघांची मैत्री ही घरातील सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली. तर एल्विशच्या हरियाणवी भाषेने लोकांमध्ये एक वेगळीच जादू केलेली पाहायला मिळाली. तर तिसऱ्या क्रमांकावर आलेली मनिषा राणी ही स्पर्धक ही देखील बिग बॉसमुळे आता लोकप्रिय झाली आहे.