घरमनोरंजनएमी अॅवॉर्ड २०१९: गेम ऑफ थ्रोन्सच्या खात्यात 'हा' महत्त्वाचा पुरस्कार!

एमी अॅवॉर्ड २०१९: गेम ऑफ थ्रोन्सच्या खात्यात ‘हा’ महत्त्वाचा पुरस्कार!

Subscribe

भारतातून अनुराग कश्यप यांच्या 'सेक्रेड गेम्स' आणि 'लस्ट स्टोरीज' या वेबसिरीज नॉमिनेशनमध्ये होत्या.

काल रात्री अमेरिकेत इंटरनॅशनल एमी अॅवॉर्डची घोषणा करण्यात आली. २०१८ प्रमाणे यावर्षी ही ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ने बाजी मारली. लॉस एंजलिसमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या बेवसिरीजला ३२ विभागात नामांकने मिळाली होती. यातील अनेक पुरस्कार आपल्या खात्यात जमा करण्यात ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ला यश मिळालं आहे. २०१८ प्रमाणेच यावर्षीपण ‘गेम ऑफ थ्रोन्स’ने बेस्ट ड्रामा सिरीजचा पुरस्कार जिंकला. या आधी ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही २०१५,२०१६ आणि २०१८मध्ये बेस्ट ड्रामा सिरीज ठरली होती.

एमी अॅवॉर्डचे यंदाचे हे ७१ वे वर्ष होते. या वर्षीचा एमी अॅवॉर्ड भारतासाठी खूप खास होता. कारण भारतातून अनुराग कश्यप यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसिरीज नॉमिनेशनमध्ये होत्या. त्याचप्रमाणे राधिका आपटेला बेस्ट अॅक्ट्रेसच्या यादीत नॉमिनेशन होते. मात्र अॅवॉर्ड मिळवण्यात भारत अपयशी ठरला.

- Advertisement -

बेस्ट अॅक्टर अॅवॉर्ड

अभिनेता बिल हैडर ला ‘बैरी’ या चित्रपटासाठी प्रमुख अभिनेता म्हणून विनोदी कॅटेगरीमध्ये एमी अवॉर्ड मिळाला. त्याने अॅवॉर्ड घेताना सह निर्माता एलेक बर्ग यांचे आभार मानले. बैरी मध्ये एका हत्यारीची गोष्ट दाखवली आहे. जो आपल्या आत दडलेल्या अभिनयाची जाणीव झाल्यावर आपलं आयुष्य बदलून टाकतो. हैडरने खूप सुंदर काम या चित्रपटात केलं आहे.

- Advertisement -

एमी अवॉर्ड २०१९ गोज टू :

सर्वोत्कृष्ट नाटक सिरीज – गेम ऑफ थ्रोन्स
सर्वोत्कृष्ट विनोदी सिरीज- फ्लीबेग
सर्वोत्कृष्ट अभिनेता (ड्रामा)- बिली पोर्टर,पोज
सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकार (विनोदी) – टोनी शालहोब,द मार्वलस मिसेज मैसेल
सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकार (नाटक) – पीटर डिंकलेज,गेम ऑफ थ्रोन्स
सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकार स्त्री – जूलिया गार्नर,ओजार्क
सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकार (चित्रपट)- पेट्रीसिया अर्क्वेट, द एक्ट
सर्वोत्कृष्ट टॉक शो – लास्ट वीक टुनाइट विद जॉन ओलिवर
सर्वोत्कृष्ट टेलिव्हीजन चित्रपट – बंडर्सनैच,ब्लॅक मिरर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -